शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

वाडीतील श्रावण गँगवरही मकोका

By admin | Published: February 25, 2016 2:52 AM

वाडी येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण धवराड आणि त्याच्या ९ साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

आरोपींची संख्या ५० : झोन एकचा रेकॉर्डनागपूर : वाडी येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण धवराड आणि त्याच्या ९ साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांची ही मकोकाची आठवी कारवाई असून झोन एकची चौथी कारवाई आहे. झोन एकचे डीसीपी शैलेश बलकवडे यांनी यासंबंधी माहिती दिली. श्रावण धवराड याच्यासह त्याचे साथीदार शुभम चरणदास मेंढे (२२) रा. पालकरनगर, नीलेश उर्फ छोटू ज्ञानेश्वर गवई, (२२), दीपक ऊर्फ विट्ठल रवि आठणकर (१९) ,पंकज बलदेव वानखेडे (२१) ,पीयूष अरुणेंद्र सिंह (१९) भीमा विजय बोरकर (२८) योगेश शंकर मैंद (२६) नरेश ऊर्फ नरू रामखिलावन पांडे (२६) सचिन प्रेम सिंह राठोड़ (२१) अशी आरोपीची नावे आहेत. १५ फेब्रुवारी रोजी श्रावणने साथीदाराच्या मदतीने मरीबा जाधवचा घरात घुसून खून केला होता. मरीबाच्या कुटुंबीयांनाही जखमी केले होते. श्रावण कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या पत्नीचे मरीबासोबत अनैतिक संबंध होते. दोन वर्षांपूर्वी मरीबा त्याच्या पत्नीला घेऊन पळाला होता. काही दिवसानंतर पत्नी परत आली. श्रावणच्या दहशतीमुळे मरीबा वाडीत येत नव्हता. श्रावण आपल्याला सोडणार नाही याची याची त्याला कल्पना होती. काही दिवसांपूर्वीच तो घरी परतला होता. शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, श्रावण आणि त्याच्या साथीदारांची वाडी परिसरात दहशत होती. त्यांच्या विरुद्ध २५ गुन्हे दाखल आहेत. श्रावणवर सर्वाधिक गुन्हे आहेत. यापूर्वी त्याला तडीपार सुद्धा करण्यात आले होते. (प्रतिनिधी)झोन एकमध्ये सर्वाधिक मकोका शहरात ८ प्रकरणात मकोकाची कारवाई करण्यात आली. यात ५० गुन्हेगारांना आरोपी करण्यात आले. यापैकी झोन एकमध्ये ४ मकोकाची कारवाई करण्यात आली असून ३० गुन्हेगारांचा समवेश आहे. मकोकाचे दोन प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावरही तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असेही बलकवडे यांनी सांगितले.