शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
3
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
4
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
5
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
6
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
7
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
8
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
9
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
10
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
12
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
13
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
14
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
15
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
16
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
17
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
18
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
19
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
20
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान

मेयोचा इन्टर्न डॉक्टरचा मृत्यू, चौकशी समीती स्थापन

By सुमेध वाघमार | Published: July 27, 2024 5:01 PM

उपचार न करताच मेडिकलला पाठविले : न्युरो सर्जन कधी मिळणार?

सुमेध वाघमारेनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) इन्टर्न डॉक्टराचा मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. कामठी रोडवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इन्टर्न डॉक्टरला मेयोमध्ये दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार न करता मेडिकलला पाठविल्याची माहिती आहे. वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त इन्टर्न डॉक्टरांनी अधिष्ठात्यांना घेराव घातला. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी या घटनेला गंभीरतेने घेत चौकशी समीती स्थापन केली. यात दोषी आढळून येणाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ‘लोकमतला’ सांगितले.   

फैज मोहम्मद खान (२२) रा. कामठी रोड असे मृत इन्टर्न डॉक्टरचे नाव आहे. मेयोमधून एमबीबीएस केल्यावर त्याची इन्टर्नशीप सुरू होती. शेवटचा एक महिना उरला होता. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी त्याचा कामठी रोडवर अपघात झाला. त्याला तातडीने मेयोच्या आकस्मिक विभागात दाखल केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सर्जरी विभागाच्या निवासी डॉक्टरांनी त्याला तपासले. मेयोमध्ये न्युरो सर्जन नसल्याने डॉक्टरांनी मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रेफर केले. मेडिकलच्या डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. फैजवर मेयो येथेच उपचार न करता मेडिकलला का पाठविले, यावर इन्टर्न डॉक्टरांनी अधिष्ठाता डॉ. चव्हाण यांना जाब विचारला. डॉ. चव्हाण यांनी त्यापूर्वीच या प्रकरणाला गंभीरतेने घेत चौकशी स्थापन करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश काढले.

रोज पडते न्युरो सर्जनी गरज

मेयोमध्ये रोज अपघाताचे रुग्ण येत असतात. काही रुग्णांना तातडीने न्युरो सर्जनची गरज पडते. परंतु हे पदच नसल्याने रुग्णांना मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठवावे लागते. यात वेळ जात असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येतो. शनिवारी इन्टर्न डॉक्टरच्या मृत्यूने पुन्हा एकदा मेयोला न्युरो सर्जनची गरज पुढे आली. डॉ. चव्हाण यांनी न्यूरो सर्जन पदाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)