लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. दोन दिवसापूर्वी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या पहिल्या संशयित रुग्णाचा अहवाल शनिवारी निगेटीव्ह आला. यामुळे मेडिकल प्रशासनासोबत सर्वाजनिक आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु त्याचवेळी चीनमधून नागपुरात आलेल्या एका तरुणीने मेडिकल गाठल्याने खळबळ उडाली.कोरोना विषाणू अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दरम्यान २७ डिसेंबर रोजी नागपुरातील जरीपटका येथील ३५ वर्षीय युवक चीनमधून आल्यानंतर त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास वाढल्याने मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये दाखल केले. त्याच दिवशी त्याच्या घशातील द्रवाचे व रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शनिवारी घशातील द्रवाचे नमुन्याचा अहवाल मेडिकल प्रशासनाला प्राप्त झाला. यात तो निगेटीव्ह आला. यामुळे रविवारी किंवा सोमवारी त्याला रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे. या अहवालाने मेडिकल प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला, परंतु दुपारी मेडिकलच्या ओपीडीत एक २४ वर्षीय तरुणी चीनमधून आल्याचे सांगून प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगताच खळबळ उडाली. डॉक्टरांच्या चमूने तिची तपासणी केली असता सर्दी, खोकला व ताप नसल्याने तिला परत पाठविण्यात आले. तिच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.
मेडिकल : कोरोना संशयित रुग्ण निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 10:18 PM
चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. दोन दिवसापूर्वी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या पहिल्या संशयित रुग्णाचा अहवाल शनिवारी निगेटीव्ह आला. यामुळे मेडिकल प्रशासनासोबत सर्वाजनिक आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
ठळक मुद्देचीनमधून आलेली एक तरुणी संशयित!