शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

मेडिकलची बिघडलेली ‘घडी’ रुळावर येणार!

By admin | Published: July 17, 2016 1:47 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) बिघडलेली घडी रुळावर आणण्यात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे ...

टॉवर आॅफ होप’ घड्याळाची टीकटीक सुरू होणार : प्रशासनाचा निर्णय नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) बिघडलेली घडी रुळावर आणण्यात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना यश येत असल्याचे दिसून येत असताना ते आता मेडिकलची जुनी ओळखही परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ६४ वर्षे जुनी व गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेल्या मेडिकलच्या घड्याळाची टीकटीक पुन्हा सुरू करण्यास त्यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या एक-दोन महिन्यात ही घड्याळ पुन्हा नव्या स्वरूपात सुरू होणार आहे. एकेकाळी ‘टॉवर आॅफ होप’ म्हणून संपूर्ण देशात ओळखली जाणारी मेडिकलची ही घड्याळ १९५२ मध्ये सुरू झाली. इलेक्ट्रीक वर्क्स शनिवार पेठ पुणे यांच्याद्वारे ती बसविण्यात आली होती. चार ‘डायल’ असलेले हे घड्याळ एका मशीनद्वारे इलेक्ट्रिकच्या साहाय्याने कार्य करीत होते. प्रत्येक घड्याळाचा व्यास ८ फूट व वजन अंदाजे ९० किलोग्रॅम होते. मध्य भारतातील सुमारे ६० फूट उंचीवरील हे एकमेव टॉवर घड्याळ होते. त्या काळी रुग्णाच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या मेडिकलची ही घड्याळ ‘टॉवर आॅफ होप’ म्हणूनही ओळखले जायचे. त्यावेळी मॉडेल मिलच्या भोंग्यावर आणि या घड्याळाच्या काट्यावर अर्ध्या नागपूरचे कामकाज चालायचे. काळ बदलत गेला घराघरांत घड्याळी पोहचल्या. मनगटावरील घड्याळी स्टेटस सिम्बॉल बनल्या. परिसरात उंच इमारती उभ्या राहू लागल्या. खासगी रुग्णालयांचा व्याप वाढला तशी मेडिकलची विश्वासार्हताही ढासळू लागली. यामुळे की काय, घड्याळही चुकीची वेळ दर्शवू लागले. नंतर ती सुमारे १५-२० वर्षे बंदच होती. २००७ मध्ये मेडिकलच्या हीरक महोत्सवानिमित्त हे घड्याळ पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न केला. टायटन कंपनीच्या सहकार्याने जुने घड्याळ काढून त्या ठिकाणी नवीन घड्याळ बसविण्यात आले. तत्कालीन नेत्रशल्य चिकित्सक डॉ. सतीश सुळे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. परंतु काही दिवस हे घड्याळ सुरू राहिले नंतर बंद पडले ते कायमचेच. आता हे घड्याळ पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. निसवाडे यांनी प्रयत्न चालविला आहे. त्यांनी एका अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी दिली. एका तज्ज्ञ व्यक्तीने नुकतीच घड्याळाची पाहणी केल्याचे समजते. त्याचे बिघडलेले पार्ट इंग्लंडमधून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहे. यात जर अपयश आले तर घड्याळाचे ‘मेकॅनिझम’ बदलविण्यात येणार आहे. यामुळे येत्या एक-दोन महिन्यात ही घड्याळ सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)