शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

मेडिकल फुल्ल! खाटांच्या तुलनेत ९१ टक्के रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:49 PM

बदलत्या हवामानामुळे वाढलेले आजार, यातच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सध्याच्या घडीला १४०० खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या ९१ टक्क्यांवर गेली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या ३०९८ तर दुपारी २ वाजेपर्यंत भरती झालेल्या रुग्णांची १८१ संख्या होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (गायनिक), औषधवैद्यकशास्त्री विभाग (मेडिसीन), अस्थीरोग विभाग (आर्थाे) व शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी) व बालरोग विभागातील (पेडियाट्रिक) बहुसंख्य खाटा फुल्ल झाल्या होत्या. काही विभागात एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार सुरू होते.

ठळक मुद्दे आर्थाे, गायनिक, मेडिसीन, सर्जरी, पेडियाट्रीक विभागात खाटांच्यावर रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलत्या हवामानामुळे वाढलेले आजार, यातच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सध्याच्या घडीला १४०० खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या ९१ टक्क्यांवर गेली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या ३०९८ तर दुपारी २ वाजेपर्यंत भरती झालेल्या रुग्णांची १८१ संख्या होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (गायनिक), औषधवैद्यकशास्त्री विभाग (मेडिसीन), अस्थीरोग विभाग (आर्थाे) व शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी) व बालरोग विभागातील (पेडियाट्रिक) बहुसंख्य खाटा फुल्ल झाल्या होत्या. काही विभागात एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार सुरू होते.बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. शहरात सर्वत्र ताप, खोकला, सर्दी व इतर आजारांची साथ सुरू आहे. शहराच्या सीमेरेषेवरील वसाहतीत डेंग्यसदृश्य व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. स्वाईन फ्लू संशयितांचीही संख्या वाढत आहे. यातच स्क्रब टायफसने डोके वर काढल्याने या आजाराचे २१वर प्रौढ रुग्ण उपचार घेत आहेत. मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र वॉर्डातील खाटांची संख्या ३२० असताना ३३० च्यावर रुग्ण उपचार घेत आहेत. बालरोग वॉर्डातील खाटांची संख्या ८० असताना रुग्णाची संख्या ९० झाली आहे. या सोबतच नेहमीच गर्दीचा वॉर्ड असलेल्या अस्थिरोग वॉर्डही फुल्ल आहे. विशेष म्हणजे स्त्रीरोग वॉर्डात खाटांची संख्या १९० असताना रुग्णांची संख्या २५०वर गेली आहे. खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढल्याने मेडिकल प्रशासनाने ३० फोल्डिंग खाटांची खरेदी केली असून संबंधित विभागाला ते उपलब्ध करून दिले आहे.औषधांचा तुटवडारुग्णांची संख्या वाढली असताना आवश्यक त्या प्रमाणात रुग्णालयात औषधे नाहीत. हाफकिन कंपनीकडून अद्यापही औषधांचा पुरवठा झाला नसल्याने अनेक औषधांचा तुटवडा पडला आहे. बाह्यरुग्ण विभागात तर नावालाही औषधे नाहीत. भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ऐनवेळी औषधांसाठी धावपळ करावी लागते, काहींवर पदरमोड करण्याची वेळ येते. वैद्यकीय शिक्षण विभागाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे अनेक वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर