लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला मेडिकलमध्ये चाचणीला सुरुवात झाल्याने नागपूरच्या तीन प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा भार काहिसा कमी झाला. यामुळे नमुने तपसणीची संख्या वाढून प्रलंबित नमुन्यांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तूर्तास तरी तसे चित्र नाही. रोज ३०० वर तपासण्या होण्याची गरज असताना २०० ही तपासण्या होत नसल्याचे वास्तव आहे. नागपुरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत नमुन्यांची तपासणी फारच संथगतीने सुरू आहे. यातच बुधवारी किटअभावी मेडिकलची प्रयोगशाळा बंद पडली, तर मेयोने नागपुरातील केवळ सहाच नमुने तपासले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ५६ वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत गुणात्मक वाढ होते. त्या तुलनेत मेयो, मेडिकल व एम्समध्ये सुरू असलेली नमुने तपासणीची संख्या समाधानकारक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. चार ते पाच तासाच्या एका ‘सायकल’मध्ये मेयो, मेडिकल व ‘एम्स’मध्ये प्रत्येकी ३०-४० नमुने तपासणे आवश्यक असताना तसे होताना दिसून येत नाही. यातही ‘एम्स’ने तपासलेले ९६ नमुन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ४२ तर अमरावती जिल्ह्यातील ५४ नमुने होते. यवतमाळमधील एक पॉझिटिव्ह नमुना वगळल्यास उर्वरित ९५ नमुने निगेटिव्ह आले. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ३३ नमुने तपासण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील १५, वर्धा जिल्ह्यातील एक, चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तर नागपुरातील ६ नमुने होते. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १७९,दैनिक तपासणी नमुने १२९,दैनिक निगेटिव्ह नमुने १२८,नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५६,नागपुरातील मृत्यू ०१,डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११,डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०१८,कारन्टाईन कक्षात एकूण संशयित ५५३
मेडिकलध्ये किटअभावी चाचणी रखडली : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणार कसा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:28 AM
नागपुरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत नमुन्यांची तपासणी फारच संथगतीने सुरू आहे. यातच बुधवारी किटअभावी मेडिकलची प्रयोगशाळा बंद पडली, तर मेयोने नागपुरातील केवळ सहाच नमुने तपासले.
ठळक मुद्देकेवळ सहाच नमुन्यांची तपासणी