लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमआरआय गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे, तर गेल्या १५ दिवसापासून सिटी स्कॅन बंद चालू अवस्थेत आहे. परिणामी, गंभीर रुग्ण अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे, नव्या एमआरआय खरेदीला मंजुरी मिळाली असून निधी हाफकिनकडे वळता केला आहे. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर खरेदी प्रक्रिया रखडली आहे.मेडिकलच्या क्ष-किरण विभागात १४ कोटी रुपये खर्च करून ‘२५६ स्लाईस, सिटी स्कॅन’ यंत्र २०१४ मध्ये घेण्यात आले. या यंत्राच्या खरेदी व्यवहारात मोठा घोळ झाल्याचे आजही बोलले जाते. या विभागात हे यंत्र स्थापन होण्यापूर्वीपर्यंत ‘सिमेन्स’ कंपनीचे सिटी स्कॅन यंत्र सुरू होते. परंतु नवीन यंत्र सुरू होताच ते बंद पडले. गेल्या सहा वर्षांपासून नव्या सिटी स्कॅनवर रोज ५० वर रुग्णांची तपासणी केली जात होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे यंत्र वारंवार बंद पडत आहे. १५ दिवसांपूर्वी हे यंत्र बंद पडले. दोन दिवसापूर्वी ते सुरू झाले परंतु आता पुन्हा बंद पडल्याची माहिती आहे. रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते, परंतु आयसीयू व गंभीर आजाराच्य रुग्णांचा प्रश्न आहे. दीड महिन्यापासून ‘एमआरआय’ही बंद पडले आहे. नव्या एमआरआय’साठी निधी मिळाला. यंत्र खरेदीचे अधिकार असलेल्या हाफकिनकडे निधी वळताही करण्यात आला. परंतु ‘कोविड’मुळे खरेदी प्रक्रिया रखडल्याने रुग्ण अडचणीत आला आहे.
मेडिकल : एमआरआय, सिटी स्कॅन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:49 PM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमआरआय गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे, तर गेल्या १५ दिवसापासून सिटी स्कॅन बंद चालू अवस्थेत आहे. परिणामी, गंभीर रुग्ण अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे, नव्या एमआरआय खरेदीला मंजुरी मिळाली असून निधी हाफकिनकडे वळता केला आहे. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर खरेदी प्रक्रिया रखडली आहे.
ठळक मुद्दे सामान्य रुग्णांची गैरसोय