लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन रविवारी रात्री समाजकंटकाने फोडल्याने सोमवारी पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. बाटलीभर पाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागली, तर दुपारनंतर नळ कोरडे पडल्याने रुग्णसेवाही प्रभावित झाली. मंगळवारपर्यंत पाईप-लाईन दुरुस्ती न झाल्यास किंवा वंजारीनगर पाण्याच्या टाकीवरून जास्तीचा पाणीपुरवठा न झाल्यास नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मेडिकलला रामबागसमोरील टीबी वॉर्डाच्या मैैदानात असलेल्या पाण्याच्या टाकीवरून (सम) व वंजारीनगर पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. साधारण १२ लाख लिटर पाण्याचा पुरवठा एकट्या रामबाग येथील ‘सम’वरूनच होतो. या पाण्याची पाईपलाईन टीबी वॉर्ड परिसरातून होऊन मेडिकलच्या मुख्य पाण्याच्या टाकीला जोडण्यात आली आहे. येथून संपूर्ण परिसराला पाणीपुरवठा केला जातो. रविवारी रात्रीच्या सुमारास टीबी वॉर्ड परिसरातून गेलेली पाण्याची लाईन समाजकंटकाने फोडली. यामुळे सोमवारी मेडिकलमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला. वंजारीनगर पाण्याच्या टाकीवरून जो काही पाणीपुरवठा झाला त्यावर कसेतरी पाण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली. वॉटर कूलरचे नळ कोरडे पडल्याने त्यांच्यावर बाहेरून पाणी विकत घेण्याची वेळ आली.सूत्रानूसार, पाण्याची ही लाईन दुसऱ्यांदा फोडण्यात आली. पहिल्यांदा जेव्हा लाईन फोडली तेव्हा पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. लाईनच्या दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यावेळेसही हीच स्थिती उद्भवणार असल्याचे चित्र आहे. सोमवारी कुठेकुठे लाईन फोडून ठेवली आहे याची माहिती मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मंगळवारी या विरोधात इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार आहे.पोलिसांत तक्रार दाखल करणारमेडिकलला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फोडल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. हे दुसरयांदा झाले आहे. या पूर्वीही इमामवाडा पोलीस ठाण्यात या विषयी तक्रार दाखल करण्यात आली होती, मंगळवारी पुन्हा तक्रार दाखल केली जाईल. पाईप लाईन दुरुस्ती होईपर्यंत ‘ओसीडब्ल्यू’ला वंजारीनगर पाण्याच्या टाकीवरून जास्तीचा पाणीपुरवठा करण्याची विनंती करण्यात आली आहे.-डॉ. गिरीश भुयारजनसंपर्क अधिकारी, मेडिकल
नागपुरातील मेडिकलची पाण्याची पाईपलाईन फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 9:52 PM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन रविवारी रात्री समाजकंटकाने फोडल्याने सोमवारी पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. बाटलीभर पाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागली, तर दुपारनंतर नळ कोरडे पडल्याने रुग्णसेवाही प्रभावित झाली. मंगळवारपर्यंत पाईप-लाईन दुरुस्ती न झाल्यास किंवा वंजारीनगर पाण्याच्या टाकीवरून जास्तीचा पाणीपुरवठा न झाल्यास नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठळक मुद्देरुग्णसेवा प्रभावित : पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता