लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला एसईबीसी १६ टक्के व व आर्थिक मागास प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू केले. त्यामुळे आरक्षणाची टक्केवारी ७८ टक्के झाली असून, खुल्या प्रवर्गासाठी केवळ २२ टक्के आरक्षण शिल्लक राहिले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत खुल्या प्रवर्गातून मोठ्या संख्येने विद्यार्थी पात्र ठरले असून, सरकारने आरक्षणाचा निर्णय घेऊन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात जोरदार निदेर्शने केली.सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांची मागणी होती की, शैक्षणिक आरक्षण हे केवळ ५० टक्क्यावर असू नये. सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. निदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. यावेळी डॉ. अनिल लद्दढ, डॉ. संजय देशपांडे, डॉ. आर.जी. चांडक, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. प्रज्ञा सावजी, डॉ. दिनेश भय्या, डॉ. सतीश पोशेट्टीवार, डॉ. संजय उगेमुगे, डॉ. विंकी रुगवाणी, डॉ. अतुल सालोडकर, डॉ. सचिन खांडेकर, डॉ. आशिष पिंपळे, डॉ. मिलिंद हरदास, डॉ. विवेक हरकरे, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. मिलिंद धर्माधिकारी, डॉ. दिनेश टावरी, डॉ. जगदीश कोठारी, डॉ. निखिल पांडे आदी सहभागी झाले होते.
सरकारच्या निर्णयाविरोधात वैद्यकीय विद्यार्थ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:58 AM