लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन नाराज असलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विविध कारणांमुळे सफाई व्यवस्थेत सुधार होत नसल्याने नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा देत आहे. अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी तूर्तास तरी राजीनामा स्वीकारलेला नाही, मात्र चौकशीचे आदेश दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मांजरेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, २५ मे २०१७ ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या निरीक्षणानंतर रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु त्यात सुधारणा झाली नाही. यात स्वच्छता निरीक्षकांची कामाप्रति उदासीनता, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांसह, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांचीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मोठा बदल झालेला नाही. परिणामी, जैविक कचऱ्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होत नसल्याची खंत व्यक्त करीत याची नैतिक जबाबदारी स्वीकारत वैद्यकीय अधीक्षक पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.तिसऱ्यांदा दिला राजीनामाडॉ. मांजरेकर यांनी या पूर्वीही दोन वेळा वैद्यकीय अधीक्षकपदाचा राजीनामा दिला. परंतु प्रत्येक वेळा तो स्वीकारण्यात आला नाही. विशेष म्हणजे, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे या मे २०१८ राजी सेवानिवृत्त होत आहे. यामुळे राजीनाम्याचा प्रभाव रुग्णालयाच्या कामकाजावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:11 AM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन नाराज असलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विविध कारणांमुळे सफाई व्यवस्थेत सुधार होत नसल्याने नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा देत आहे. अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी तूर्तास तरी राजीनामा स्वीकारलेला नाही, मात्र चौकशीचे आदेश दिले आहे.
ठळक मुद्देमेयो : अधिष्ठात्यांनी दिले चौकशीचे आदेश