नीरीचा अहवाल : रुग्णांचा जीव धोक्यातसुमेध वाघमारे नागपूरपाणी म्हणजे जीवन! तेच जर दूषित झालं, तर आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणूनच पाणी उकळून, गाळून पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु रुग्णालयातच अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असेल तर...मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) मेडिकलमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा अहवाल दिल्याने खळबळ उडाली आहे.मेडिकलला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ६० वर्षे जुनी आहे. त्यावेळची रुग्णसंख्या गृहीत धरून ही सोय करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात यात कोणतेही बदल झाले नाहीत. मेडिकलला महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या मुख्य टाकीतून संपूर्ण मेडिकल व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला पाणीपुरवठा होतो. मेडिकलमध्ये १५०० वर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा राबता असतो. यामुळे रोज ३० लाख लिटर पाण्याची गरज असताना साधारण २२ ते २५ लाख लिटरपर्यंत पाणी मिळते. परंतु या पाण्याची योग्यता तपासली असता हे पाणी अयोग्य असल्याचे सामोर आले आहे. विशेष म्हणजे, मेडिकल प्रशासन रुग्णांवरील उपचारांना घेऊन कठोर उपाययोजना अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालयाच्या देखभालीकडे विशेष लक्ष देत नसल्याने हा प्रकार होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दूषित पाण्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जीव धोक्यात आला आहे. ९० टक्के पाणी अशुद्ध‘नीरी’च्या वॉटर टेक्नालॉजी अॅण्ड मॅनेजमेंटने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात मेडिकलमधील विविध वॉर्ड, विभाग, अतिदक्षता विभागातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. यात रुग्णालयाच्या साधारणपणे ९० ठिकाणामधील नळाला पाणी अशुद्ध येत असल्याचे निष्पन्न आले. मात्र मुख्य टाकीपर्यंत येणारे पाणी हे शुद्ध असल्याचाही निर्वाळा देण्यात आला.
मेडिकलचे पाणी अशुद्ध
By admin | Published: October 17, 2016 2:38 AM