लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : राज्य शासनाने प्रलंबित मागण्या व समस्यांवर सकारात्मक विचार करून त्या तातडीने साेडविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/सवंग कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागण्या पूर्ण न केल्यास १ मेपासून कामबंद आंदाेलन करण्याचा इशाराही या कर्मचारी संघटनेने दिला आहे. दुसरीकडे, या आंदाेलनात सहभागी हाेणार असल्याची माहिती वानाडाेंगरी नगर परिषद व हिंगणा नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी दिली.
यासंदर्भात नगर परिषदेचे देवेंद्र शेंडे व नगर पंचायतचे अमाेल घाेडमारे यांनी संयुक्तरीत्या सांगितले की, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. त्या मागण्यांचा शासनदरबारी सतत पाठपुरावा केला जात असून, शासनाने त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/सवंग कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले असून, प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण न केल्यास १ मेपासून आंदाेलन करण्याचा इशारा दिल्याचेही या दाेन्ही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदाेलनात वानाडोंगरी नगर परिषदेचे देवानंद शेंडे, हरिश्चंद्र बारंगे, किरण रोंगे, वीणा वैद्य, कुमोद सोनटक्के, लीलाधर डाखळे, गौरव देवतारे, सचिन गाढवे, उमेश किन्हेकर, विजय सुरवते, संतोष मालकुलवार, अश्विनी साठे, कपिल डाफे, रूपेश काळे, गुलाब डोहे, गोपाल साखरे, भेडे, हिंगणा नगर पंचायतचे अमोल घोडमारे, ए. एस. इंगोले, मोहिनी वैद्य, स्नेहल देशमुख, दत्तात्रय गडदे, प्रीती चकोले, गौतम ढोके, रतपाल वहाणे, सुनील नागदेवे, संजय माहुरे, चैतन्य डाहे आदी कर्मचारी सहभागी हाेणार असल्याचे सांगण्यात आले.