शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; या स्थानकांवर थांबणार नाहीत लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 8:03 AM

रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी आज  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी आज  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याने चिंचपोकळी, करी रोड येथे लोकल थांबणार नाहीत. पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या वेळी लोकल जलद मार्गावरून धावतील. तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत लोकल रद्द करण्यात येतील. भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.४२ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत भायखळा स्थानकातून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धिम्या लोकल भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या लोकलना दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबा असेल. मात्र, विद्याविहारपासून त्या धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करी रोड येथे लोकलला थांबा नसेल.

हार्बर मार्गावरून सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या लोकल आज सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल यादरम्यान विशेष लोकल धावतील. पश्चिम रेल्वे मार्गावरील भार्इंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक असेल. या वेळी बोरीवली ते विरारदरम्यान धिम्या लोकल जलद मार्गावर धावतील, तर काही लोकल रद्द करण्यात येतील.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेHarbour Railwayहार्बर रेल्वे