शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मेहुल चोकसीने घातला नागपूरच्या सराफा व्यावसायिकाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 9:21 PM

देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सहआरोपी असलेल्या गीतांजली समूहाच्या मेहुल चोकसी याने नागपूरच्या सराफा व्यावसायिकालाही कोट्यवधीने गंडविल्याची माहिती समोर येत आहे. गीतांजली समूहाच्या ज्वेलर्स विक्रीची फ्रेंचाईसी देण्याच्या नावावर सराफा व्यापारी देवेन कोठारी यांना २.४० कोटीने गंडविले. विशेष म्हणजे कोठारी गेल्या दोन वर्षांपासून या फसवणुकीविरोधात न्यायालयात लढा देत आहेत.

ठळक मुद्देफ्रेंचाईसीच्या नावावर अडीच कोटींचा चुना : दोन वर्षांपासून न्यायालयीन लढा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सहआरोपी असलेल्या गीतांजली समूहाच्या मेहुल चोकसी याने नागपूरच्या सराफा व्यावसायिकालाही कोट्यवधीने गंडविल्याची माहिती समोर येत आहे. गीतांजली समूहाच्या ज्वेलर्स विक्रीची फ्रेंचाईसी देण्याच्या नावावर सराफा व्यापारी देवेन कोठारी यांना २.४० कोटीने गंडविले. विशेष म्हणजे कोठारी गेल्या दोन वर्षांपासून या फसवणुकीविरोधात न्यायालयात लढा देत आहेत. या प्रकरणामुळे गीतांजली समूह व चोकसीच्या भ्रष्टाचाराचे नवे पैलू समोर येत आहेत.देवेन कोठारी व त्यांचे वकील अ‍ॅड. गजेंद्र सावजी यांनी पत्रपरिषदेत या फसवणुकीबाबत माहिती दिली. २०१३-१४ ला गीतांजली समूहाचे गीली, संगीनी व डी-डमास या ब्रॅन्डचे दागिने शहरात विक्रीसाठी देवेन कोठारी यांना फ्रेंचाईसी देण्याचा. या बदल्यात जमानत म्हणून सुरुवातीला आस्मी ज्वेलर्स कंपनीच्या नावाने ९० लाख व व गीतांजली समूहाच्या नावाने ९० लाख चेकद्वारे पाठविण्यास सांगितले. यानुसार कोठारी यांनी दोन्ही कंपन्यांच्या नावे ३०-३० लाखाचे सहा धनादेश जमा केले. यानंतर प्रत्यक्ष ज्वेलरी पाठविण्यासाठी ४७ लाखाची मागणी कंपनीकडून करण्यात आली. कोठारी यांनी आरटीजीएसद्वारे ही रक्कम गीतांजली समूहाकडे पाठविली. मात्र कंपनीने केवळ ९५ हजाराचा माल कोठारी यांना पाठविला. हा मालही निकृष्ट दर्जाचा असल्याने कोठारी यांनी तक्रार केली. मात्र कर्मचाºयांची चूक झाल्याचे सांगून परत माल पाठविण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा १० लाखाची मागणी करण्यात आली. कोठारी यांनी ही रक्कमही आरटीजीएसने जमा केली. मात्र त्यानंतर कमी मूल्याचे दागिने अधिक दर लावून पाठविण्यात आल्याने कोठारी यांनी कंपनीकडे तक्रार केली. प्रत्यक्ष मेहुल चोकसीला भेटून फ्रेंचाईसीचा करार रद्द करण्याची मागणी कोठारी यांनी केली. चोकसीने दिलेले १ कोटी ८० लाखाचे धनादेश परत करण्याचे आश्वासन दिले. कोठारी यांनी कंपनीचे दागिनेही परत पाठविले. मात्र यानंतर गीतांजली समूहाकडून कुठलाही संवाद न झाल्याने देवेन कोठारी यांनी २०१५ मध्ये गीतांजली समूहाविरोधात सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली. मात्र यादरम्यान गीतांजली समूहाने उलट कोठारी यांना खोट्या गुन्ह्यात फसवण्यासाठी मुंबईतील अंधेरी व दुसऱ्या एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती सावजी यांनी दिली. यानंतर कोठारी यांनी गीतांजली समूह व मेहुल चोकसीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली.कोठारी यांना मिळत होती धमकीदेवेन कोठारी यांनी सांगितले, न्यायालयाद्वारे गीतांजली समूहाला नोटीस गेल्यानंतर समूहाच्या लोकांद्वारे धमक्यांचे सत्र सुरू झाले. तक्रार मागे घेण्यासाठी मोबाईलवरून धमक्या दिल्या जात होत्या. शिवाय १० ते १५ लोकांनी अनेकवेळा कोठारी यांच्या सीताबर्डी येथील दुकानात येऊनही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कोठारी यांनी यावेळी सांगितले.अनेकांची फसवणूक झाल्याचा अंदाजगीतांजली समूहाने ज्याप्रमाणे नागपूरच्या देवेन कोठारी यांना फ्रेन्चाईसी देऊन गंडा घातला. समूहाने वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथेही फ्रेन्चाईसी दिल्याची माहिती आहे. याप्रमाणे देशात इतरही ठिकाणी फ्रेन्चाईसी दिल्याची शक्यता आहे. गीतांजली समूहात एमडी राहिलेले संतोष श्रीवास्तव नामक व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही बाब उघड केली होती. कोठारी यांच्याप्रमाणे इतर सराफा व्यावसायिकांकडूनही जमातीच्या नावाने कोट्यवधी घेतले असण्याची शक्यता आहे. याशिवास कमी दराची वस्तू अनेक पट अधिक दराने व्यावसायिकांना पाठविली जात होती. त्यानंतर धमक्या देऊन व्यावसायिकांना भीती दाखविली जात असल्याचे देवेन कोठारी यांनी सांगितले.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाnagpurनागपूर