आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या सामाजिक कार्यातून नागपूरच्या शहराचा देश-विदेशात लौकिक वाढविणारे दानशूर कस्तूरचंद डागा यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. मात्र, त्यांच्या स्मृती वर्षालाच मनपाने जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरी करण्याची तयारी सुरू केली आहे. डागा यांचे जन्मशताब्दी वर्ष अविस्मरणीय राहील अशा स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा दावा महापालिका करीत आहे. डागा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८५५ तर मृत्यू २० जानेवारी १९१७ ला झाला होता. इकडे कस्तूरचंद पार्क येथील त्यांच्या पुतळ्याकडे मात्र दुर्लक्ष आहे.कस्तूरचंद पार्कच्या भाड्यातून महसूल विभागाला वर्षाला लाखों रुपयांचा महसूल मिळतो. परंतु डागा यांच्या मूर्तीचे सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडे पैसा नाही. एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत डागा यांचा पुतळा फूटपाथवर ठेवण्यात आला आहे. पुतळ्याची सुरक्षा व देखभाल करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. माजी महापौर राजेश तांबे यांनी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी १९९६ मध्ये तत्कालीन महापौर राजेश तांबे यांची भेट घेऊ न मूर्ती परिसराचे सौंदर्यीकरण केले होते. त्यानंतर डागा यांच्या मूर्तीकडे कुणाचेही लक्ष नाही.असे असूनही महापालिका डागा यांचे जन्मशताब्दी वर्ष धूमधडाक्यात साजरे करणार असल्याचा दावा करीत असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.‘लोकमत’शी चर्चा करताना नागरिकांना महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. डागा यांची नवीन पिढीला ओळख व्हावी. यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. मूर्तीच्या परिसराचे सौंदर्यीकरण तर दूरच मूर्ती कस्तूरचंद पार्कमध्ये बसविण्याचाही मनपाला विसर पडला आहे.कोण आहेत कस्तूरचंद डागासन १७९० मध्ये बिकानेर येथून माहेश्वरी समाजातील काही कुटुंब नागपुरात आले होते. यात अबीरचंद डागा यांचाही समावेश होता. त्यांचे पुत्र कस्तूरचंद डागा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८५५ साली झाला होता. वयाच्या १५ वर्षी त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. नागपूरसह विदर्भात विपुल प्रमाणात असलेली खनिज संपत्ती व कापूस विचारात घेता त्यांनी खाणी व मिल सुरू केल्या. देशा सोबतच विदेशात मेसर्स आर.बी.बंशीलाल अबीरचंद प्रतिष्ठानच्या शाखा सुरू केल्या. विकासातील त्यांचे भरीव योगदान विचारात घेता त्यांना विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.अशी बसविली मूर्तीकस्तूरचंद डागा यांचा मृत्यू २० जानेवारी १९१७ रोजी झाला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कस्तूरचंद पार्कच्या उत्तर-पूर्व भागात त्यांची संगमरवरची मूर्ती त्यांचे मित्र माणिकचंद दादाभाई यांनी बसविली होती. यासाठी त्यांनी डागा कुटुंबीयांकडून एकही पैसा घेतला नाही. कस्तूरचंद डागा माझे घनिष्ठ मित्र होेते. त्यांच्या स्मृती मूर्ती स्वरुपात कायम राहाव्या, असे माणिकचंद दादाभाई यांचे म्हणणे होते.
जन्मशताब्दी साजरी होतेय की स्मृतीवर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 1:04 AM
आपल्या सामाजिक कार्यातून नागपूरच्या शहराचा देश-विदेशात लौकिक वाढविणारे दानशूर कस्तूरचंद डागा यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे.
ठळक मुद्देडागांचा मनपाला विसर : मूर्तीवर धूळ साचली; परिसरही अस्वच्छ