लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात, नागपुरात साडेसहा तास व त्यापेक्षा जास्त मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. यावरून शहरात सुमारे ५० हजार ते एक लाख लोक या व्यसनात आकंठ बुडाले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, यातील बहुसंख्य लोकांना मोबाईलमुळे मानसिक आजाराकडे आपली वाटचाल होत असल्याचे ध्यानीमनीही नाही. यामुळे ते आणखी धोकादायक ठरत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञाचे म्हणणे आहे.मोबाईलच्या गरजेचे रूपांतर व्यसनात होऊ लागले आहे. लहानांना त्याची सवय तर तरुण पिढीवर त्याचे थेट दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. मेयोच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, भारतात सुमारे ८० कोटी लोकांकडे मोबाईल तर यातील ३५ कोटी लोकांकडे स्मार्ट मोबाईल आहेत. मनोविकारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मोबाईलचा अतिवापर हे एक कारण प्रकर्षाने दिसून येत आहे. मेयो रुग्णलायाच्यावतीने मोबाईलच्या अतिवापराला घेऊन एका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १८ ते २० वयोगटातील १०० मुलांवर नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यात सर्वच मुलांनी दिवसाच्या साडेसहापेक्षा जास्त तास मोबाईलवर घालवित असल्याचे तर काहींनी १२ ते १४ तास वापर करीत असल्याचे सांगितले.या प्रश्नांची उत्तरे हो, असेल तर व्यसनतुम्ही तुमच्या झोपेच्या वेळीही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत असाल, घरातील किंवा कार्यालयातील लोक तुमच्या मोबाईलच्या वापराला घेऊन चिडत असतील, मोबाईलचा वापर लपविण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असाल, मोबाईल सोडून दुसºया कुठल्याही कामात मन लागत नसेल तर तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागले आहे, असा त्याचा समज असल्याचे डॉ. सोमानी यांनी सांगितले.मोबाईल आजाराची लक्षणेमोबाईलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थता वाटणे, मोबाईल वाजल्याचा सतत भास होणे, मोबाईल हातात नसताना बोटाच्या हालचाली होणे, मोबाईल जवळ नसला तरी तो वाजल्याचा आवाज येणे ही मोबाईलच्या आजाराची लक्षणे आहे. यातून पुढे छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन ताण निर्माण होऊन नैराश्य येऊ शकते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 8:03 PM
सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात, नागपुरात साडेसहा तास व त्यापेक्षा जास्त मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. यावरून शहरात सुमारे ५० हजार ते एक लाख लोक या व्यसनात आकंठ बुडाले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, यातील बहुसंख्य लोकांना मोबाईलमुळे मानसिक आजाराकडे आपली वाटचाल होत असल्याचे ध्यानीमनीही नाही. यामुळे ते आणखी धोकादायक ठरत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञाचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देनागपुरात सुमारे ५० हजारावर रुग्ण : मेयोच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे सर्वेक्षणजागतिक मानसिक आरोग्य दिन