लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने ‘लोकमत नॉलेज फोरम’ अंतर्गत अर्थसंकल्प-२०१७ मध्ये प्रत्यक्ष करात महत्त्वाची दुरुस्ती, ‘जीएसटी’मध्ये संधी व आव्हाने आणि यूएसए-इंडिया कर नियमन या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन वर्धा रोडवरील हॉटेल प्राईड येथे शुक्रवारी करण्यात आले होते. चर्चासत्राचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना विक्रीकर विभागाचे सहआयुक्त (व्हॅट, प्रशासन) पी.के. अग्रवाल. यावेळी उपस्थित लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, बँक आॅफ इंडियाचे झोनल व्यवस्थापक सी.जी. पोपेरे, वरिष्ठ सनदी लेखापाल अशोक शाह, नरेश सेठ, संकेत शाह, लोकमतचे फायनान्स कंट्रोलर मोहन जोशी, लोकमतचे सहउपाध्यक्ष (अकाऊंट) एस.एस. खरे, सहउपाध्यक्ष नीलेश सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
लोकमत नॉलेज फोरममध्ये ‘जीएसटी’वर मंथन
By admin | Published: February 25, 2017 1:59 AM