लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीमुळे नागपुरात उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक संकटात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे मत चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी व्यावसायिकांतर्फे आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.अग्रवाल म्हणाले, नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी व्यापाऱ्यांचे पोलिसांना सहकार्य राहणार आहे. कोरोनामुळे सध्या शहराच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेला छेद गेला आहे. भविष्यात आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. नागपुरात दरदिवशी कोरोनाची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. अशा स्थितीत अधिकाऱ्यांतर्फे नागरिकांसोबत सौहार्दपूर्ण व्यवहार करावा. अग्रवाल म्हणाले, वर्ष २००५ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पोलीस मित्र समितीची स्थापना केली होती. समितीची नियमित बैठक व्हायची. पोलीस आयुक्त थेट संपर्कात राहायचे आणि सूचना द्यायचे. आता कोरोना महामारीविरुद्ध लढण्यात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी अशा समितीची गरज आहे. पोलीस आयुक्तांनी पोलीस मित्र समितीची स्थापना करावी.अमितेश कुमार यांनी स्वागताचा स्वीकार करीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. व्यापारी आणि नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी कठोर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. याप्रसंगी धीरज मालू यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले आणि संकटसमयी व्यापाºयांतर्फे महामारीवर नियंत्रणासाठी पोलिसांसोबत मिळून काम करू, असे आश्वासन दिले. यावेळी संजय के .अग्रवाल उपस्थित होते.
व्यापारी पोलिसांसोबत काम करण्यास तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 11:58 PM
कोरोना महामारीमुळे नागपुरात उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक संकटात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे मत चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ठळक मुद्देकॅमिटचे पोलीस आयुक्तांना निवेदन : कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी