शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

वाहतूकदारांच्या संपाला कळमना व्यापाऱ्यांचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:05 AM

वाहतूकदारांच्या संपाची झळ आता आम आदमीला बसू लागली आहे. शहरात भाजी व फळांचे भाव दुप्पट झाले आहे. पाचव्या दिवशी कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनीही संपाला समर्थन दिले. या संपामुळे शहरात ८ ते १० ट्रक माल बाजारात पोहचत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भाजी व फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभाजी व फळांचे भाव झाले दुप्पट : बाजारात पोहचतोय ८ ते १० ट्रक माल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूकदारांच्या संपाची झळ आता आम आदमीला बसू लागली आहे. शहरात भाजी व फळांचे भाव दुप्पट झाले आहे. पाचव्या दिवशी कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनीही संपाला समर्थन दिले. या संपामुळे शहरात ८ ते १० ट्रक माल बाजारात पोहचत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भाजी व फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.मंगळवारी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कु मारवाह यांच्या नेतृत्वात ट्रान्सपोर्टस् कळमना बाजारात पोहचले. येथे फळ व्यापाऱ्यांनी त्यांच्या संपाला समर्थन देत दुकाने बंद ठेवली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेश छाबरानी यांनी सांगितले की, वाहतूकदारांच्या संपामुळे अन्य ठिकाणाहून येणाऱ्या फळांचे ट्रक कमी झाले आहे. त्यामुळे भाव दुप्पट झाले आहे. अनंतापूर, वारंगल, नांदेड, नाशिक, मलकापूर, करनूल, औरंगाबाद येथून मोसंबी, डाळींब, केळी, अननस आदी फळांची आवक घटली आहे.रोजगारावर संकटट्रकचे ड्रायव्हर व क्लिनर हे सुद्धा या संपाचा हिस्सा आहे. त्यांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. त्याचबरोबर कळमना बाजारात मजुरी करणाऱ्यांनाही रोजगार उपलब्ध होत नाही. टोलचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्याचा भुर्दंड सरकारच्या महसुलावर बसतो आहे. बुकिंग कार्यालयाला कुलूप लागले असून, व्यापाऱ्यांना माल बुकिंग करताना अडचणी येत आहे. येणाऱ्या काही दिवसात अशीच स्थिती राहिल्यास सामान्य माणसावर महागाईचा बोझा पडणार आहे.आम्ही टॅक्सपेयर आहोत, गुंड बदमाश नाहीदोन दिवसांपूर्वी आम्ही मौदा येथे शांततेत आंदोलन केले. त्यावेळी आमच्यासोबत पोलीस अधिकारी होते. आम्ही कुठलाही उपद्रव केला नाही, कुणाला बाधा पोहचविली नाही. तरीसुद्धा ट्रान्सपोर्टस्वर मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आम्ही जर दोषी आहोत तर आमच्यावर कारवाई करावी, आम्ही टॅक्सपेयर्स आहोत, गुंड बदमाश नाही.कुक्कु मारवाह, अध्यक्ष, नागपूर ट्रकर्स युनिटी बंद केली दुकाने, राहणार पूर्ण समर्थनट्रान्सपोर्टस्च्या संपाला आम्ही समर्थन दिले आहे. फळांची आवक कमी झाली आहे. असे असले तरी, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांचा माल खरेदी करण्यात येत आहे. परंतु संप कायम राहिल्यास, काहीच निर्णय न झाल्यास आम्ही संपाचे पूर्ण समर्थन करू.आनंद डोंगरे, अध्यक्ष, फळ बाजार, कळमना

 

टॅग्स :Strikeसंपvegetableभाज्या