लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडा-मुंबई एक्स्प्रेस, ०२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, ०२१०६ गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस, ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या गाड्यात प्रवास करणाऱ्या महिलांना आरपीएफच्या महिला कर्मचारी व अधिकारी प्रवासात होणाऱ्या त्रासाबद्दल विचारपूस करतात. त्यांना काही समस्या असल्यास त्वरित त्याचे निदान करण्यात येते. तसेच सुरक्षेसाठी असलेल्या १८२ या हेल्पलाईनची माहिती त्यांना देण्यात येते. सहप्रवाशांकडून कुठलेही खाद्यपदार्थ घेऊ नये, त्यांना आपल्या प्रवासाबाबत माहिती देऊ नका, खाद्यपदार्थ आयआरसीटीसीच्या पेंट्रीकारमधूनच खरेदी करा, आपल्या सामानाची काळजी आपणच घ्या, बर्थच्या खाली असलेल्या लोखंडी रॉडला आपले सामान बांधणे, खिडकीजवळ बसताना आपल्या दागिन्यांची काळजी घेणे तसेच फिजिकल डिस्टन्स ठेऊन तोंडाला मास्क लावणे आदी सूचना या अभियानात देण्यात येत आहेत.
महिला रेल्वे प्रवाशांसाठी 'मेरी सहेली' अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:45 AM