शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपूर विद्यापीठातील गुणवंत पदकांना मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:15 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांना काहीसा नाराज करणारा ठरणार आहे.

ठळक मुद्देदीक्षांतमधील पदकांवर संक्रांतदीडशे पदके झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांना काहीसा नाराज करणारा ठरणार आहे. दानदात्यांनी सुधारित रकमेचा धनादेश देण्यास नकार दिल्यामुळे, तब्बल दीडशे सुवर्ण व रौप्य पदके कमी करण्यात आली आहेत. यामुळे मागील वर्षीपर्यंत ज्या अभ्यासक्रमांच्या गुणवंतांना सन्मानित करण्यात येत होते, यंदा त्याच अभ्यासक्रमांत पदकांचा दुष्काळ जाणवणार आहे.विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना १०५ व्या दीक्षांत समारंभापर्यंत जवळपास ३४० पदके पारितोषिके प्रदान करण्यात येत होती. नागपूर विद्यापीठात काही दानदात्यांनी अगदी १९३० साली पुरस्कारासाठी निधी दिला होता. त्याकाळी मोठी वाटणारी अनामत रकमेची आताची किंमत फारच कमी आहे. त्या रकमेच्या आधारे दरवर्षी पदकांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठालाच निधी द्यावा लागत होता. त्यामुळे विद्यापीठाने दानदात्यांना पत्र लिहिले व आताच्या बाजारभावाच्या हिशेबाने सुधारित रकमेच्या धनादेशाची मागणी केली.सुवर्णपदकांसाठी ७५ हजार तर रौप्यपदकांसाठी ५० हजार रुपयांची रक्कम ठरविण्यात आली. जर सुधारित धनादेश देणे शक्य नसेल तर मूळ अनामत रक्कम दानदात्यांचे कुटुंबीय घेऊन जाऊ शकतात, असेदेखील स्पष्ट करण्यात आले होते. विद्यापीठाने यासंबंधात दानदात्यांना पत्र पाठविले. यातील ३५ जणांनी अतिरिक्त रक्कम भरण्याची तयारी दाखविली होती, तर १७ जणांनी अनामत रक्कम परत मागितली होती. २२ जणांचा पत्ता विद्यापीठाकडे नव्हता. अनेक दानदात्यांनी २१००, २२०० रुपयांची अनामत रक्कम अनेक वर्षांअगोदर भरली होती. आता नव्या नियमांमुळे त्यांना सुवर्णपदकासाठी ७२,८०० रुपये भरावे लागले. आता १०६ व्या दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने दीडशे पदके कमी केली आहेत. विद्यार्थ्यांना एकूण १९१ पदके-पारितोषिके प्रदान करण्यात येतील. तर अनुक्रमे तीन लाख व दोन लाखांची रक्कम भरल्याने सुवर्ण व रौप्य पदक यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ