शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

ज्येष्ठ नागरिकांनी दिला वन्यजीव संवर्धनाचा संदेश

By admin | Published: February 09, 2016 3:00 AM

राज्यातील वन आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पुणे येथील ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या सायकल रॅलीचा सोमवारी सेमिनरी हिल्स येथील वन सभागृहात समारोप करण्यात आला.

७५० किलोमीटरची सायकल रॅली : वन सभागृहात समारोप नागपूर : राज्यातील वन आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पुणे येथील ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या सायकल रॅलीचा सोमवारी सेमिनरी हिल्स येथील वन सभागृहात समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे, ५० ते ६५ वयोगटातील या ज्येष्ठ नागरिकांच्या सायकल रॅलीने वर्धा, यवतमाळ, वणी, ताडोबा, चंद्रपूर, गडचिरोली, नवेगाव, नागझिरा, भंडारा व पेंच असा ७५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ती रॅली सोमवारी नागपुरात पोहोचली. दरम्यान, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री श्री भगवान यांनी रॅलीतील ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक महिप गुप्ता व उपसंचालक किशोर मिश्रीकोटकोर उपस्थित होते.रॅलीमध्ये विजय हिंगे, अविनाश मेडेकर, हेमंत थिंगळे, दत्तात्रय गोखले, पद्माकर आगाशे, माणिक पवार, सतीश रेंगे, अरविंद चितळे व लहू यांचा समावेश होता. यावेळी पीसीसीएफ भगवान यांनी मार्गदर्शन करताना वन विभागाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची गरज असल्याचे सांगितले. वन विभाग लोकसहभागातून वन आणि वन्यजीव संवर्धन करीत आहे. नवनवीन योजना आखून त्या यशस्वीरीत्या राबविण्यावर भर दिला जात आहे. यात ज्येष्ठ नागरिकांनी सायकल रॅलीच्या माध्यमातून विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती केली आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक महिप गुप्ता यांनी नवीन उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे काम केले जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)