फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:57 AM2024-04-12T11:57:24+5:302024-04-12T11:59:25+5:30

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री प्रकरणामध्ये हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

Meta is not responsible for invalid pastes | फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही

फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : इंटरनेट सेवेच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या प्रसिद्ध मेटा कंपनीने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठासमक्ष स्वत:ची भूमिका स्पष्ट करताना फेसबुक व इन्स्टाग्रामवर खातेधारकांद्वारे जाहीर केल्या जाणाऱ्या अवैध पाेस्टकरिता कंपनी जबाबदार नाही, असे स्पष्ट केले.

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. दरम्यान, न्यायालयाने फेसबुक व इन्स्टाग्रामवरून नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री केली जात असल्याची बाब लक्षात घेता मेटा कंपनीला यावर स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार कंपनीने प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:ची बाजू मांडली आहे. मेटा कंपनी भारतात फेसबुक व इन्स्टाग्राम सेवा पुरवित असून, या दोन्ही ठिकाणी कोट्यवधी भारतीयांची खाती आहेत आणि ते फेसबुक व इन्स्टाग्रामवर रोज कोट्यवधी संदेश, छायाचित्रे, व्हिडीओ इत्यादी बाबी जाहीर करतात. मेटा कंपनी या दोन्ही सेवांकरिता मध्यस्थ म्हणून कार्य करते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा व सर्वोच्च न्यायालयाने ‘श्रेया सिंघल’ प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार खातेधारकांनी जाहीर केलेल्या बाबींकरिता मेटा कंपनी जबाबदार नाही. परिणामी अशा बाबींमुळे मेटा कंपनीवर कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
 

Web Title: Meta is not responsible for invalid pastes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.