नागपूर : दिवाळीतील प्रकाश उत्सवा नंतर आता आकाशातही १६ व १७ नोव्हेंबर रोजी आकाशातील दिवाळी उल्का वर्षावाचे निमित्ताने नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. या आनंद उत्सवात आपणही सहभागी होण्याचे आवाहन खगाेल तज्ज्ञ व विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
निरभ्र रात्री अचानक एखादी प्रकाशरेषा क्षणार्धात चमकून जाते, यालाच आपण तारा तूटला असे समजतो. मात्र ती उल्का असते. सूर्यकुलाचे घटक असलेले धुमकेतू व लघुग्रह आदींचे वस्तूकण जेव्हा भ्रमण मार्गावर पडतात आणि जेव्हा आपली पृथ्वी परिभ्रमण करतांना या लहानमोठ्या वस्तू गुरुत्वाकर्षणाने खेचले जातात. वातावरणात घर्षणामुळे पेट घेतल्याने आपल्याला या प्रकाशरेषा लाल, पिवळ्या निळ्या पांढऱ्या रंगात चमकताना दिसतात. बहूतांशी उल्का या वातावरणात नष्ट होतात. परंतु अपवादात्मक एखादी उल्का पूर्णांशाने न जळता पृथ्वीवर येऊन आदळते तिला अशनी म्हणतात.
दोन दिवसांचा हा प्रकाश उत्सव टेंपल टटल या धुमकेतुचे अवशेष असुन सुमारे दर ३३ वर्षांनी फार मोठा उल्का वर्षाव होत असतो. असा उल्का वर्षाव पाहण्याची संधी यानंतर २०३१ मध्ये येईल. विळ्याच्या आकाराची सिंह राशीत सुमारे मध्यरात्रीनंतर पूर्वेस उदित होईल आणि पहाटे आकाश मध्याजवळ असेल तेव्हा उल्कांचे प्रमाण जास्त असेल .या कालावधीत चंद्र अधिक प्रकाशित असल्याने छोट्या उल्कांचे प्रमाण कमी असेल. अंधाऱ्या भागात झोपेच्या स्थिती निरीक्षण करणे सोयीचे होईल. यावेळी वेळ,रंग,दिशा व तेजस्वीता नोंदता येईल. याचवेळी लाल रंगाचा मंगळ ग्रह कर्क राशीत व सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह वृषभ राशीत पश्चिम आकाशात पाहता येईल.
सुनिता विलियम्सच्या स्पेस स्टेशनचेही दर्शनगेल्या अनेक दिवसांपासून ज्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सुनिता विलियम्स आहे, त्या स्टेशनचे दर्शनही सध्या आकाशात हाेत आहे. पृथ्वीपासून ४०० किमी दूर ताशी २८,५०० किमी वेगाने हे स्टेशन पृथ्वीभाेवती फिरत आहे. हे स्टेशन पश्चिमेकडून उत्तरेकडे जाताना सायंकाळी ६.१५ ते ६.३० या काळाता उघड्या डाेळ्यांनी पाहता येईल.