लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तराची मेट्रो रेल्वे नागपुरात सुरू करण्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येत आहे, परंतु विदेशातील विशेतज्ज्ञांचा समावेश असलेली जनरल कन्सलटंटची चमू, अनुभवी अभियंत्यांची चमू आणि मोठ्या कंत्राटदार कंपन्यांना मोठ्या गंभीर घटना थांबविण्यात अपयश आले आहे. पूर्वी झालेल्या घटनांपासून बोध घेतला असता तर गुरुवारी सकाळी संत्रा मार्केट परिसरात मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान क्रेनचे टॉवर कोसळले नसते.क्रेन कोसळण्याचा घटनेचे मूळ शोधून पुढे अशा घटना होणार नाहीत, यासाठी उपाय शोधण्याच्या कामात जनरल कन्सलटंट आणि मेट्रोची चमू जुंपली असल्याचा महामेट्रोतर्फे दावा करण्यात येत आहे.यापूर्वी आॅगस्ट २०१६ मध्ये वर्धा रोडवरील अजनी चौकात मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान तैनात करण्यात आलेला ट्रॅफिक वार्डन मारुती ठाकरे यांना एका चारचाकी वाहनाने उडविले होते. या गंभीर घटनेत मेट्रोशी जुळलेल्या कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही महामेट्रोने कोणताही बोध घेतला नाही. त्यानंतरसुद्धा मेट्रोच्या खड्ड््यांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच मेट्रोच्या खड्ड््यामध्ये एक दुचाकीस्वार पडल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी आॅगस्टमध्ये हिंगणा रोडवर मेट्रो साईटच्या बाजूला रस्त्यावर एका अपघातात दुचाकीस्वार वनिता मसराम यांचा मुलगा रितेशचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मेट्रोची चूक दिसून येत नाही, पण मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे अरुंद झालेल्या मार्गावर वाहतूक खोळंबल्याची स्थिती नेहमीच दिसून येते.वर्धा रोडवर शुक्रवारी मेट्रोचा काँक्रिट मिक्सर रस्त्यात रूतून बसला. कारण तेच आहे की, मेट्रोच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाल्यामुळे या काँक्रिट मिक्सरला अपघात झाला. नागरिकांच्या मागणीनंतर काम झालेल्या जागेच्या सभोवतातील बॅरिकेट्स हटविण्यास नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला सांगण्यात आले होते. या कंपनीने महिन्यांपासून लावलेले बॅरिकेट्स हटविले, पण बॅरिकेट्स हटविल्यानंतर जागा समतोल आहे किंवा नाही, हे पाहिले नाही. बॅरिकेट्सच्या आजूबाजूला मोठे खड्डे दिसून येत आहेत. खड्डे बुजविण्याचे साधे सौजन्यही कंपनीने दाखविले नाही. वर्धा रोडवर खड्डा बुजविला असता तर काँक्रिट मिक्सर खड्ड््यात गेला नसता.लवकरच येणार तपासणी अहवालमहामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांनी सांगितले की, संत्रा मार्केट परिसरात क्रेनचे टॉवर कोसळल्याच्या घटनेचा तपासणी अहवाल दोन ते तीन दिवसात येणार आहे. जनरल कन्सलटंटच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केली आहे. रिच-४ चे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश कुमार या घटनेची चौकशी करीत आहेत. अहवालानंतर आवश्यक उपाय आणि भविष्यात अशी घटना होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
‘मेट्रो’ने बोध घेतला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:16 AM
आंतरराष्ट्रीय स्तराची मेट्रो रेल्वे नागपुरात सुरू करण्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येत आहे, परंतु विदेशातील विशेतज्ज्ञांचा समावेश असलेली...
ठळक मुद्देक्रेन कोसळल्यानंतर शोधताहेत उपाय : महामेट्रोच्या कार्यप्रणालीवर प्रश्न