शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नागपुरातील ‘मेट्रो डबलडेकर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:13 AM

वर्धा रोडच्या धर्तीवर कामठी रोडवर महामेट्रोतर्फे डबलडेकर पूल तयार करण्यात येत आहे. त्याकरिता महामेट्रोने जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगची (जीएडी) फाईल मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे आठ महिन्यांपूर्वी दिली होती. पण आता फाईल कुठे आहे, याचा पत्ता नाही.

ठळक मुद्दे‘जीएडी’ फाईल मध्य रेल्वे, महामेट्रो व बांधकाम विभागाकडून गायब

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडच्या धर्तीवर कामठी रोडवर महामेट्रोतर्फे डबलडेकर पूल तयार करण्यात येत आहे. हा पूल गड्डीगोदाम रेल्वे पुलाजवळ ट्रिपलडेकर दिसून येणार आहे. त्याकरिता महामेट्रोने जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगची (जीएडी) फाईल मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे आठ महिन्यांपूर्वी दिली होती. त्याची प्रत झोन मुख्यालयाला पाठविली आहे. या कालावधीत फाईलला मंजुरी तर सोडाच, पण आता तर फाईल कुठे आहे, याचाही पत्ता नाही.मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या अधिकाऱ्यांनुसार मंडळाने फाईल महामेट्रोकडे काही सूचनांसाठी परत पाठविली तर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे मत आहे की, रेल्वेकडून लवकरच ट्रिपलडेकर पूल निर्मितीसाठी मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे फाईल महामेट्रोकडे नसल्याचे यावरून स्पष्ट होते.मध्य रेल्वेचे स्वतंत्ररीत्या कार्यरत बांधकाम विभागाच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी आपल्याकडे फाईल नसल्याचे सांगत आहेत.अशा परिस्थितीमुळे गड्डीगोदाम रेल्वे पूल परिसरात मेट्रोचा डबलडेकर पुलाचे काम अडकण्याची शंका आहे. जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगच्या फाईलला रेल्वेकडून हिरवी झेंडी मिळेपर्यंत डबलडेकर मेट्रो पुलाची निर्मिती अशक्य आहे. या प्रकरणी महामेट्रो आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्य ब्रिज इंजिनिअरनी जागेची पाहणी करून फाईलमध्ये काही संशोधन करण्यासाठी महामेट्रोकडे परत पाठविली होती. त्यानंतर महामेट्रोने नवीन संशोधनाची जीएडी फाईल पुन्हा मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाकडे पाठविली होती.या फाईलवर डीआरएम आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर मंजुरीसाठी प्रधान मुख्य अभियंत्यांकडे (बांधकाम) पाठविली जाईल. सध्या ही फाईल कुठे आहे, याचा पत्ता नाही. यामुळे जीएडी फाईलला मंजुरी मिळण्यास वेळ लागल्यास डबलडेकर पुलाच्या बांधकामाला उशीर होण्याची शक्यता आहे.

मेट्रोची कोणतीही फाईल ‘पेंडिंग’ नाहीनागपूर मेट्रोच्या डबलडेकर पुलासंबंधी कोणतीही फाईल माझ्या कार्यालयात पेंडिंग नाही.- संतोष कुमार, प्रधान मुख्य अभिंयंते (बांधकाम), मध्य रेल्वे, मुंबई.

मध्य रेल्वेने महामेट्रोला दिली फाईलमहामेट्रोने १५ दिवसांपूर्वी संशोधित जीएडी फाईल मध्य रेल्वेला दिली होती. त्याला बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले होते. या विभागाने काही संशोधन सुचविले होते. त्यानंतर ही फाईल दोन दिवसांपूर्वी महामेट्रोला परत दिली आहे.- के.के. मिश्रा, वरिष्ठ डीसीएम,मध्य रेल्वे, नागपूर मंडळ.

मंजुरीच्या प्रतीक्षेत महामेट्रोमहामेट्रोने मध्य रेल्वेला जीएडी फाईल सोपविली आहे. त्यात काही संशोधन आणि सूचना केल्या होत्या. संशोधनासह जीएडी फाईल पुन्हा मध्य रेल्वेकडे सोपविली आहे. या फाईलला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.- अखिलेश हळवे,डीजीएम (सीसी), महामेट्रो.

टॅग्स :Metroमेट्रो