शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

कस्तूरचंद पार्कच्या देखभालीसाठी मेट्रोचा निधी  ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:58 PM

कस्तूरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल्वे स्टेशनला देताना मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने कस्तूरचंद पार्कची देखभाल दुरु स्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, देखभाल करण्यास मेट्रो रेल्वे कापोर्रेशनने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे यासाठी लागणारा निधी मेट्रो रेल्वेने द्यावा व ही जबाबदारी महापालिकेने सांभाळावी. असा निर्णय बुधवारी महापालिका कार्यालयात आयोजित नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देमनपाला मोबदला देणार : हेरिटेज समितीची प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कस्तूरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल्वे स्टेशनला देताना मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने कस्तूरचंद पार्कची देखभाल दुरु स्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, देखभाल करण्यास मेट्रो रेल्वे कापोर्रेशनने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे यासाठी लागणारा निधी मेट्रो रेल्वेने द्यावा व ही जबाबदारी महापालिकेने सांभाळावी. असा निर्णय बुधवारी महापालिका कार्यालयात आयोजित नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.समितीचे सदस्य तथा नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. शुभा जोहरी, नगररचना विभागाच्या नागपूर शाखेच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, वास्तुविशारद अशोक मोखा उपस्थित होते.समितीच्या बैठकीत नऊ विषयावर चर्चा झाली. २० आॅगस्ट रोजी सद्भावना दिवसानिमित्त आयोजित क रण्यात येणाºया सद्भावना दौडला समितीने मंजुरी दिली. तसेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आयोजित करण्यालाही सशर्त परवानगी दिली.स्वच्छतादूत विनोद दहेकार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील अस्वच्छता आणि पार्किंगचा विषय मांडला. आयुक्त कार्यालय अर्थात जुने सचिवालय ही इमारत पुरातन वास्तू असून ती बघण्यासाठी अनेक पर्यटक तेथे येतात.या इमारतीच्या परिसरात नादुरुस्त वाहने आणि इतर शासकीय वाहने उभी असल्याने इमारत विद्रूप दिसते. इतकेच नव्हे तर रात्री असामाजिक तत्त्व इमारत परिसरात मद्य प्राशन करीत असल्याचे त्यांनी समितीच्या लक्षात आणून दिले. या संदर्भात समितीने गंभीर दखल घेत रात्रीच्या वेळी इमारत परिसरात असामाजिक तत्त्वांना प्रवेश बंदी करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.पोलीस लाईन टाकळी, तेलंखेडी येथील क्रीडांगणाकरिता अनुदानित जागेच्या वापरात बदल करून शैक्षणिक संकुलासाठी वापर करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. विषय मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जनार्दन भानुसे, मेट्रोच्यावतीने माणिक पाटील, राजीव यलकावार, अन्य विषयांसाठी विनोद दहेकार, संजय दुधे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोKasturchand Parkकस्तूरचंद पार्क