शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

मेट्रोने दाखल केले महाकार्ड : पहिले कार्ड महापौरांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:35 AM

माझी मेट्रोने एका छोटेखानी समारंभात शुक्रवारी महाकार्ड दाखल केले. पहिले कार्ड महामेट्रोच्या कार्यालयात महापौर नंदा जिचकार यांना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी प्रदान केले. महापौर म्हणाल्या, महाकार्ड प्राप्त करणे ही आनंदाची बाब आहे. पुढील काही दिवसांत या कार्डमुळे नागपूरकरांची जीवनशैली बदलणार आहे.

ठळक मुद्देमेट्रो, शॉपिंग मॉल, सिनेमागृहातही कार्डचा उपयोग होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माझी मेट्रोने एका छोटेखानी समारंभात शुक्रवारी महाकार्ड दाखल केले. पहिले कार्ड महामेट्रोच्या कार्यालयात महापौर नंदा जिचकार यांना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी प्रदान केले.महापौर म्हणाल्या, महाकार्ड प्राप्त करणे ही आनंदाची बाब आहे. पुढील काही दिवसांत या कार्डमुळे नागपूरकरांची जीवनशैली बदलणार आहे.दीक्षित म्हणाले, शहरात भ्रमण करण्यासह खरेदीसाठी कार्ड उपयोगी ठरणार आहे. पुढील काही दिवसांत कुणीही या कार्डमध्ये बॅलेन्स जमा करून शहरात फिरू शकतो. कार्डचा उपयोग नागपूरसह पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे करता येईल. मेट्रो लवकरच व्यावसायिक राईड सुरू करणार आहे. या संदर्भातील कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. महाकार्ड त्याचाच एक भाग आहे. कार्ड मनपा आणि एसबीआय बँकेच्या मदतीने तयार केले आहे. कार्ड केवळ १०० रुपयांत खरेदी करावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना कार्डमध्येआवश्यकतेनुसार १० हजार रुपयांपर्यंत बॅलेन्स टाकता येणार आहे.कार्ड नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण३० सप्टेंबर २०१८ ला महामेट्रो नागपूरच्या ट्रायल रन विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत महाकार्डचे लोकार्पण करण्यात आले होते.हे कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्पेसिफिकेशनच्या आधारावर तयार करण्यात आले असून, ईएमव्ही पद्धतीवर आधारित आहे. कार्ड नागपूरकरांसाठी महत्त्चपूर्ण ठरणार असून, त्यांची जीवनशैली बदलणार आहे. एसबीआयच्या सहाय्याने प्रवाशांसाठी महाकार्डची सेवा उपलब्ध केली आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहने आणि मेट्रोचा जास्तीत जास्त उपयोग करावा, या दृष्टीने महामेट्रो आणि मनपा एकत्रितरीत्या काम करीत आहे. या कॉमन कार्डद्वारे प्रवाशांना फिडर सेवा व मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल. घरापासून मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशन ते कार्यालय, शाळा, कॉलेज आणि तेथून परत घरापर्यंत येण्यासाठी उपलब्ध होणारे ऑटो, मोबाईक व बसमध्ये हे कार्ड स्वाईप करून प्रवासी तिकिटाचे देय करू शकेल. कार्डचा उपयोग शॉपिंग मॉल, सिनेमागृह, हॉटेल्स आणि विविध ठिकाणी करता येईल.३ मार्चला येणार सीआरएमएसचे अधिकारीदीक्षित म्हणाले, आरडीएसओकडून नागपूर मेट्रो प्रकल्पाला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रिच-१ च्या परीक्षणासाठी सीआरएमएसचे अधिकारी ३ मार्चला येणार आहेत. त्यांच्या प्रमाणपत्रानंतरच मेट्रो रेल्वेला व्यावसायिक स्वरूपात चालविण्याची परवानगी मिळेल.

 

टॅग्स :Metroमेट्रोMayorमहापौर