विमानतळ स्थानकापर्यंत पिलरची उंची कमी : प्रवाशांना फिडर सेवा आनंद शर्मा नागपूर मेट्रो रेल्वे एअरपोर्टच्या तीन रस्ता चौकातून पिलरवरून हळूहळू उतरून जमिनीवर धावणार आहे. त्यासाठी वर्धा रंोडवर खापरी पुलाच्या दिशेने काही पिलर्स एका रांगेत बनविलेले नाहीत. चिचभुवन उड्डाण पुलाच्या अलीकडील पिलर्सची उंची कमी ठेवण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे जमीन आणि पिलरवरून धावणार आहे, हे विशेष. जमिनीवरील बांधकाम वर्धा रोडलगत विमानतळापुढे सुरू आहे. तर वर्धा रोडवर पिलर अर्थात वाया डक्ट सेक्शनचे बांधकाम वेगात सुरू आहे. पाहणीदरम्यान असे दिसून आले की, सीताबर्डी ते बुटीबोरीकडे जाणाऱ्या वर्धा रोड मार्गावर एअरपोर्ट तीन रस्ता चौकापर्यंत उभारण्यात आलेले पिलर एका रांगेत आहेत. पण पुढील काही पिलर थोडे उजव्या बाजूला बनविले आहेत. ५.६ कि़मी. मेट्रो रेल्वे जमिनीवर धावणार नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडेच उपमहाव्यस्थापक जनसंपर्क/समन्वयन शिरीष आपटे यांनी सांगितले की, वर्धा रोडवर जुन्या खापरी पुलाजवळ मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापकांचे कार्यालय आहे. तेथून पुढे ५.६ कि़मी.पर्यंत मेट्रो रेल्वे जमिनीवर धावणार आहे. येथे ट्रॅक, सिग्नल आणि अन्य संबंधित कामे सुरू आहेत. या कामाची सुरुवात प्रकल्पाच्या कार्यालयापासून होणार आहे. येथून पुढे मेट्रो रेल्वेला सीताबर्डीकडे चालविण्यासाठी कार्गो टर्मिनल रोडपर्यंत पिलरची उंची कमी ठेवण्यात आली आहे. पहिल्या पिलरची उंची कमी, त्यानंतर थोडी जास्त आणि नंतर उंच पिलर तयार केले आहेत. या पिलरवर स्लॅब (गर्डर) टाकण्यात येणार आहे. या प्रकारे मेट्रो मार्ग तयार होणार आहे. हा मार्ग उतरता राहणार आहे. याचप्रकारे मेट्रो रेल्वे जमिनीवरून सीताबर्डीकडे जाईल, तेव्हा पिलर उंच राहतील. विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सी सेवा आपटे यांनी सांगितले की, विमानतळाच्या तीन रस्ता चौकातून विमानतळापर्यंत जाण्यासाठी लोकांना टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याअंतर्गत लोकांना बसद्वारे विमानतळापर्यंत आणि तेथून विमानतळ मेट्रो रेल्वे स्थानकापर्यंत ने-आण करण्यात येणार आहे. विमानतळ मेट्रो स्थानकाचे डिझाईन एल अॅण्ड टी आणि राजेंद्रन असोसिएट्सने तयार केले आहे. स्थानकाचे बांधकाम आयएल अॅण्ड एफएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरू केले आहे. स्थानकावर पार्किंगची व्यवस्था स्थानकाचे बांधकाम २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगकरिता पर्याप्त व्यवस्था राहणार आहे. येथे वायफाय, कॅफेटेरिया, सीसीटीव्हीची सुविधा राहील. दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प, मोठे दरवाजे असलेले टॉयलेट राहील. नेत्रहीनांसाठी विशेष टाईल्स लावण्यात येईल. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला गार्ड तैनात राहील. टॉयलेट आधुनिक स्वरुपाचे राहतील. एकूणच विमानतळ मेट्रो स्थानकाला पूर्णत: आधुनिक स्वरूप दिले जाणार आहे.
जमीन मार्गावर वळणार मेट्रो
By admin | Published: January 22, 2017 2:27 AM