केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे ३७५० कोटी : ८६८० कोटींचा प्रकल्पनागपूर : जर्मनीच्या केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे नागपूर मेट्रो रेल्वेला देण्यात येणाऱ्या एकूण कर्जावर नागपुरात हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये रविवार, १० एप्रिलला सकाळी ९ वाजता शिक्कामोर्तब होणार आहे.करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके यांच्यासह खासदार, आमदार व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. ३७५० कोटी रुपयांच्या (५०० युरो) कर्ज करारावर केएफडब्ल्यू आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी स्वाक्षरी करतील. जर्मनीच्या केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला जवळपास ३७५० कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जाची परतफेड २० वर्षांत नागपूर : यासंदर्भात १ एप्रिलला दिल्ली येथे एका छोटेखानी समारंभात डिपार्टमेंट आॅफ एकॉनॉमिकल अफेयर्स आणि केएफडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली होती. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प ८६८० कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येत आहे. यातील ३७५० कोटी रुपये कर्ज स्वरूपात मिळणार आहे. यात रोलिंग स्टॉक, ट्रॅक्शन, ट्रॅक्स, रिचेस २ आणि ४ एलिव्हेटेड स्टेशनसाठी वायडक्ट, मेट्रो रेक, वीज पुरवठा आदी कामे कर्जाद्वारे करण्यात येणार आहे. कर्ज स्वरूपात मिळणाऱ्या रकमेची परतफेड २० वर्षांत करण्यात येणार आहे. यात पहिले पाच वर्ष केवळ व्याज फेडायचे आहे. व्याजदर ०.६ टक्के राहणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुगीचे दिवस आले असून, बांधकामाला वेग आला आहे. पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे.
मेट्रो रेल्वेच्या कर्जावर आज शिक्कामोर्तब
By admin | Published: April 10, 2016 3:10 AM