शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

मेट्रो रेल्वे प्रकल्प जनतेच्या सहभागातून पूर्ण व्हावा

By admin | Published: September 19, 2016 2:41 AM

शहरात ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचा एकत्रित विकास होणार आहेत. त्यात नऊ हजार कोटींच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे.

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : एसीसीईतर्फे अभियंता दिवसनागपूर : शहरात ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचा एकत्रित विकास होणार आहेत. त्यात नऊ हजार कोटींच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे. येणाऱ्या काळात पर्यटन वाढणार असून त्यासाठी मेट्रो रेल्वे हा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी जनतेचे सहकार्य आवश्यकअसल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या (इंडिया) नागपूर शाखेतर्फे पी.टी. मसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभियंता दिनानिमित्त ‘मेट्रो रेल्वे व नागपूरचा विकास’ या विषयावर लक्ष्मीनगर चौक येथील सायंटिफिक सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. मंचावर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वयक) शिरीष आपटे, असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या (इंडिया) नागपूर शाखेचे अध्यक्ष सतीश रायपुरे, उपाध्यक्ष नारायण पळसापुरे, वरिष्ठ सदस्य रवींद्र गंधे उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागपूर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होणार एकत्रित विकास कामानंतर नागपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली असून जानेवारी २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले आहे. विमानतळ ते मिहान या मार्गावर यावर्षीच्या डिसेंबरअखेर ट्रायल होईल, असा संकल्प आहे. यासाठी कार्यरत यंत्रणा आणि अभियंतांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी गडकरी यांनी दिल्ली येथे बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांचे उदाहरण दिले. अडीच वर्षे कालावधीत पूर्ण होणारा रस्ता पंतप्रधानांनी ४०० दिवसात पूर्ण करण्यास सांगितले होते. आता या रस्त्याचे काम वेगात सुरू असून सर्व समस्यांवर मात करीत कालवधीत पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागात विकास कामे करताना जागेचे चारपट आणि शहरात दुप्पट रक्कम देण्याचे निर्धारित केले आहे. त्यामुळे अडचणी सुटल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये यासाठी २० हजार रुपये जमा असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. २८५ लाख टन सिमेंट जमासिमेंटचे रस्ते बांधण्याचे जाहीर केले तेव्हा सिमेंट कंपन्यांनी कार्टेल करून सिमेंट बोरीचे दर ३०० वरून ३५० रुपयांवर नेले. आज आमच्याकडे १२०, १३०, १४० रुपये बोरीप्रमाणे २८५ लाख टन सिमेंट पडून आहे. भ्रष्टाचारमुक्त कामे झाल्यास विकास शक्य असल्याचा टोला गडकरी यांनी लगावला. एकत्रित विकासप्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानक, विमानतळ आणि बसस्थानकांचा एकत्रित विकास करण्यात येणार आहे. अहमदाबाद, सूरत व बडोदाच्या धर्तीवर नागपुरात बसपोर्टचा विकास होईल. बसपोर्ट एनएचएआय बांधणार आहे. भूमिगत पार्किंग राहील. याशिवाय अपघात जागा शोधून त्याचा विकास करणार असल्याचे गडकरी म्हणाले.अंबाझरी तलावात विवेकानंद यांच्या जीवनावर लाईट व साऊंड शो आणि तेलंखेडी येथे म्युझिकल फाऊंटेन तयार करण्यात येणार आहे.स्टेशनचे डिझाईन विदेशातील स्टेशनसारखेमेट्रो रेल्वेचे प्रत्येक स्टेशन जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेतील स्टेशनसारखे राहील. वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस व सायकल सर्व्हिस राहील. प्रकल्पात ६५ टक्के सोलरचा उपयोग होणार असून त्यावर रेल्वे धावणार असून स्टेशनवरसुद्धा उपयोग होईल. पार्किंग त्रासमुक्त राहील. अजनी ते प्राईड हॉटेलपर्यंत रस्ता, उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वे हा तिहेरी संगम राहील. याच मार्गावर मनीषनगर येथील रेल्वेवर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. एल अ‍ॅण्ड टीचे अभियंते व्यंकटरमन यांनी डिझाईन तयार केले आहे. कमी किंमतीत रोलिंग स्टॉक उपलब्ध व्हावेत म्हणून राज्यात उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. सी-प्लेनची योजनानागपुरात सी-प्लेनची योजना आहे. त्याचे नाव फ्लोटिंग बोट अ‍ॅक्ट असे राहील. कॅनडाच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करून नागरी उड्डयण विभागाकडे दिला आहे. ९, १२ आणि २८ जागांचे विमान राहील. त्यांची निर्मिती मिहानमध्ये करण्याचा विचार आहे. हे विमान अंबाझरी आणि तेलंखेडी वॉटर पोर्ट येथून चार तासात शेगाव, शिर्डी आणि परत नागपुरात येणार आहे.लंडन स्ट्रीटचा विकासदुसऱ्या टप्प्यात वर्धा रोडवरील लंडन स्ट्रीटवर ३५ हेक्टर जागेचा विकास करण्यात येणार आहे. हफीज कॉन्ट्रक्टर यांनी डिझाईन तयार केले आहे. दोन्ही बाजूला व्यावसायिक झोन उभे राहतील. जवळपास १ ते १.५ लाख चौरस फूट जागा हॉस्पिटलला देण्याचे ठरले आहे. प्रकल्प मनपा बांधणार आहे. एक कि़मी. मेट्रो रेल्वेसाठी ३०० ते ३५० कोटींचा खर्च येतो. तर मेट्रो रेल्वेसाठी ५० कोटी रुपये लागतात. त्यामुळे या भागात मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे गडकरी म्हणाले.