लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे रुळावर धावण्याची नागपूरकरांची प्रतीक्षा शुक्रवारी संपली. अखेर मेट्रो रेल्वे रुळावर धावली. मिहान मेट्रो डेपोमध्ये हैदराबाद मेट्रोकडून तीन वर्षांच्या लीजवर आलेले तीन कोचेस जोडून तयार केलेल्या रेल्वेला बॅटरीवर चालणाºया बुलंद शंटिंग वाहनाच्या मदतीने चालविण्यात आले. रेल्वेला महाराष्टÑ मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.डिसेंबरअखेरपर्यंत मेट्रो प्रवासासाठी सज्जयाप्रसंगी पत्रपरिषदेत दीक्षित यांनी सांगितले की, विमानतळ ते खापरी स्टेशनपर्यंत ५.६ कि़मी.पर्यंत जमिनीवरून धावणाºया कोचेसची महामेट्रोच्या स्तरावर टेस्टिंग व ट्रायल रन घेण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गेनायझेनच्या (आरडीएसओ) चमूच्या निगराणीत विधिवत ट्रायलची सुरुवात होईल. ही ट्रायल एक महिना सुरू राहील. त्यानंतर डिसेंबरच्या अखेरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी सज्ज होईल. सकाळी आणि सायंकाळी रेल्वे धावणार आहे. प्रारंभी रेल्वेचा उपयोग मेट्रोसंबंधी सामानांच्या वहनासाठी करण्यात येणार आहे. दीक्षित म्हणाले, आरडीएसओचे ट्रायल रन सुरू होण्यापूर्वी जमिनीवरील रेल्वेच्या कामाचे उर्वरित १० टक्के काम पूर्ण करण्यात येईल. रेल्वे चालविण्यासाठी महावितरणच्या खापरी फिडरमधून वीज घेण्यात येणार आहे. त्यानंतर शंटिंग वाहनाविना रेल्वे रुळावर धावणार आहे. लवकरच आणखी तीन कोच हैदराबाद येथून नागपुरात येणार आहे. त्यामुळे नागपुरात दोन मेट्रो रेल्वे होणार आहे.कोच डिझाईनसाठी नागपूरकरांकडून सूचना मागविल्यादीक्षित म्हणाले, ‘ट्रायल रन’करिता आणण्यात आलेल्या मेट्रो कोचचा बाहेरील आणि अंतर्गत सजावट शहरानुरूप करण्यात येणार आहे. त्यावर नागपूरच्या विशेषत:सह इतिहास, भूगोल, ऐतिहासिक वारसा चित्र अंकित होणार आहे. यासाठी नागपूरकरांकडून सूचना मागविल्या आहेत. योग्य सूचनांवर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.२०१८ च्या मध्यपर्यंत येणार चीनचे ६९ कोचनागपूर मेट्रो प्रकल्पासाठी २०१८ च्या मध्यपर्यंत चीनवरून ६९ कोच येणार आहेत. चीनकडून कोच खरेदीवर काही संघटना विरोध करीत आहेत. लोकशाहीत त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. त्याचे महामेट्रो स्वागत करते. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय निविदेत कमी बोली लावल्यामुळे चीन रेल्वे रोेलिंग स्टॉक कंपनीला कंत्राट दिले आहे. देशातील विविध मेट्रोच्या तुलनेत ही बोली १५ ते २० टक्के कमी आहे. यामध्ये १० वर्षांपर्यंत कोचेसची देखरेख आणि सुट्या भागांच्या खर्चाचा समावेश आहे. चीनमध्ये मेट्रो रेल्वेची जोडणी होईल. त्याला लागणारे सुटे भाग आणि उपकरणे जपान, युरोप देश आणि भारताचे राहणार आहेत. या प्रकारे रेल्वे केवळ एक तृतीयांश चीनची राहील.खड्डे बुजविण्याचे निर्देशदीक्षित म्हणाले, मेट्रो प्रकल्पाच्या साईटच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. त्यांना बुजविण्याचे निर्देश शुक्रवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाºयांना दिले आहेत. मेट्रोच्या कामामुळे शहरात कुठेही खड्डे पडले असतील तर महामेट्राला मोबाईल करून सांगावे. सर्व खड्डे तातडीने बुजविण्यात येईल. पत्रपरिषदेत महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) जनककुमार गर्ग आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.सुमेधा मेश्राम चालविणार मेट्रोदिल्ली मेट्रोमध्ये सलग सात वर्ष मेट्रो चालविण्याचा अनुभव असलेली गोंदिया येथील तरुणी सुमेधा मेश्राम नागपुरात मेट्रो रेल्वे चालविणार आहे. ती व्यवसायाने अभियंता आहे. ३१ मे रोजी ती महामेट्रोमध्ये वरिष्ठ पदावर रुजू झाली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये असताना ती दररोज १३५ ते १४० कि़मी. रेल्वे चालवायची. नागपूरमध्ये रुजू झाल्यानंतर तिने हैदराबाद येथे सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
मेट्रो रेल्वे रुळावर धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:58 AM
मेट्रो रेल्वे रुळावर धावण्याची नागपूरकरांची प्रतीक्षा शुक्रवारी संपली. अखेर मेट्रो रेल्वे रुळावर धावली.
ठळक मुद्देआरडीएसओचा ट्रायल रन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात : आणखी तीन कोच येणार