मेट्रोने झिरो माईलची देखभाल करावी : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:29 PM2020-09-30T21:29:29+5:302020-09-30T21:30:50+5:30

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या झिरो माईल स्मारकाची मेट्रो रेल्वेने पुढील आदेशापर्यंत देखभाल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले.

Metro should maintain zero mile: High Court order | मेट्रोने झिरो माईलची देखभाल करावी : हायकोर्टाचा आदेश

मेट्रोने झिरो माईलची देखभाल करावी : हायकोर्टाचा आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या झिरो माईल स्मारकाची मेट्रो रेल्वेने पुढील आदेशापर्यंत देखभाल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त न्यायालय मित्र अ‍ॅड. कार्तिक शुकुल यांनी झिरो माईल स्मारक राज्य सरकारच्या मालकीचे असल्याची माहिती न्यायालयाला दिली. परंतु, न्यायालयाने अन्य काही बाबी लक्षात घेता मेट्रो रेल्वेला झिरो माईलची देखभाल सुरू ठेवण्यास सांगितले. गेल्यावर्षी नागपूरमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण परिषद झाली. त्या परिषदेत देशभरातील दीडशेवर न्यायमूर्ती सहभागी झाले होते. दरम्यान, अनेक न्यायमूर्तींनी उत्सुकतेपोटी झिरो माईल स्मारकाला भेट दिली. परंतु, तेथे गेल्यानंतर झिरो माईलची दुरवस्था पाहून सर्वांची निराशा झाली. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. या प्रकरणावर आता ७ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होईल.

Web Title: Metro should maintain zero mile: High Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.