लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या झिरो माईल स्मारकाची मेट्रो रेल्वेने पुढील आदेशापर्यंत देखभाल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त न्यायालय मित्र अॅड. कार्तिक शुकुल यांनी झिरो माईल स्मारक राज्य सरकारच्या मालकीचे असल्याची माहिती न्यायालयाला दिली. परंतु, न्यायालयाने अन्य काही बाबी लक्षात घेता मेट्रो रेल्वेला झिरो माईलची देखभाल सुरू ठेवण्यास सांगितले. गेल्यावर्षी नागपूरमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण परिषद झाली. त्या परिषदेत देशभरातील दीडशेवर न्यायमूर्ती सहभागी झाले होते. दरम्यान, अनेक न्यायमूर्तींनी उत्सुकतेपोटी झिरो माईल स्मारकाला भेट दिली. परंतु, तेथे गेल्यानंतर झिरो माईलची दुरवस्था पाहून सर्वांची निराशा झाली. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. या प्रकरणावर आता ७ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होईल.
मेट्रोने झिरो माईलची देखभाल करावी : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 9:29 PM
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या झिरो माईल स्मारकाची मेट्रो रेल्वेने पुढील आदेशापर्यंत देखभाल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले.
ठळक मुद्दे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था