लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमान्यनगर आणि सुभाषनगर मेट्रो स्टेशनदरम्यान ३० मे रोजी ट्रायल रन घेतल्यानंतर महामेट्रोनागपूरने मंगळवारी सायंकाळी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत सीताबर्डी ते झिरो माईल्स स्टेशनदरम्यान प्रवास केला. परीक्षणानंतर मेट्रोने आता अपलाईनवर रेल्वेचा प्रवास घडवून आणला.मेट्रोने क्रॉस ओव्हर म्हणजे डाऊन मार्गाने जाणाऱ्या रेल्वेने अप मार्गावरदेखील प्रवास केला. पहिल्यांदाच या प्रकारचा प्रवास मेट्रो केल्याने अप मार्गावरील मेट्रो ट्रेनचे आवागमन होण्याचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासी फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वेतून प्रवास केला. डाऊन लाईनवरून झिरो माईल्स स्टेशनपर्यंत जात मेट्रो रेल्वेने दुसऱ्या रुळावरून म्हणजेच अपलाईन येथे प्रवास केला. शहीद गोवारी उड्डाण पूल पार करीत मेट्रो पुढे गेली तेव्हा पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढले. रात्रीच्या अंधारात वरून जाणारी मेट्रो नागपूरकरांचे आकर्षण आणि कुतूहलाचा विषय ठरली. यापूर्वी ७ मार्चला मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. लोकमान्य ते सुभाषनगर दरम्यान ट्रायल रन झाल्यानंतर अवघ्या ५ दिवसात मेट्रोने सीताबर्डी ते झिरो माईल्स टप्पा गाठल्याने प्रकल्पाच्या कामाची गती कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीताबर्डी ते झिरो माईल्स धावली मेट्रो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:37 PM
लोकमान्यनगर आणि सुभाषनगर मेट्रो स्टेशनदरम्यान ३० मे रोजी ट्रायल रन घेतल्यानंतर महामेट्रो नागपूरने मंगळवारी सायंकाळी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत सीताबर्डी ते झिरो माईल्स स्टेशनदरम्यान प्रवास केला. परीक्षणानंतर मेट्रोने आता अपलाईनवर रेल्वेचा प्रवास घडवून आणला.
ठळक मुद्देक्रॉस केला शहीद गोवारी उड्डाण पूल : प्रवासी फेऱ्या वाढणार