लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात ट्रॅकचे मेंटेनन्ससाठी (मेंटेनन्स) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून एका यंत्राने ट्रॅकचे विविध कार्य होणार आहे. त्याकरिता एक नवीन मशीन आयात केली आहे.मेक इन इंडिया अंतर्गत महत्त्वाच्या आणि आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञाच्या साहाय्याने भारतातच या मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अत्याधुनिक मशीन फरिदाबाद येथे प्लासर इंडियाने तयार केली आहे. मेंटनन्स ०८-१६ बी एसएच/झेडडब्ल्यू ही नवीन मशीन पूर्णपणे सक्षम आहे. उच्च कार्यक्षमतेच्या मशीनद्वारे ट्रॅकची दुरुस्ती, कामाच्या गुणवत्तेची खात्री, मोजमाप, कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासह रुळांमधील अंतर मोजणे आदी विविध कार्यांचा समावेश आहे. मशीनचे डिझाईन आणि फ्रेम सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.नागपूर मेट्रो प्रकल्पात २३ रेल्वे येणार आहेत. सर्वांची देखभाल व दुरुस्ती मिहान आणि हिंगणा कार शेडमध्ये होणार आहे. कार शेडमध्ये रुळांचे जाळे तयार करण्यात आले असून गिट्टीच्या आधारे या रुळांना मजबूती प्रदान करण्यात आली आहे. या सर्व कार्याकरिता मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र आता हे सर्व कार्य या आधुनिक मशीनच्या सुयोग्य पद्धतीने होणार आहे. सरळ असणाऱ्या आणि पलटणाºया अशा दोन्ही ट्रॅकवर ही मशीन कार्य करते. यामुळे वेगळ्या टर्नआऊट मशीनची आवश्यकता भासत नाही. मशीन आॅपरेटिंगचा खर्च कमी आहे. स्मार्ट-एएलसी, सीएमएस आणि सीडब्ल्यूएस प्रणालीच्या नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या मशीनद्वारे मॅन्युअल मापनदेखील केले जाऊ शकते. यामुळे निश्चितच नागपूर मेट्रोवरील ट्रॅकची देखभाल करण्यासाठी सुरक्षा, विश्वसनीयतेत भर पडेल.मशीनमध्ये एक स्वयंचालित युनिट आहे. यात नवीनतम डेटा रेकॉर्डिंग, मूल्यांकन आणि प्रदर्शन प्रणालीसह (डीआरपी) मशीनची नियंत्रण प्रणाली पूर्णपणे डिजिटल आहे. व्हिज्युअल कंट्रोलसाठी कॅमेरा आणि मॉनिटरिंग स्क्रीन मशीनमध्ये लावण्यात आले आहेत. या मशीनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अतिरिक्त मशीनची व क्रेनची गरज भासणार नाही.