लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत विमानतळ ते मिहान मेट्रोपर्यंतच्या जमिनीवरून धावणाºया ५.६ कि़मी.च्या ‘ट्रायल रन’साठी तीन मेट्रो कोचेस बुधवारी दुपारी हैदराबाद येथून नागपुरात पोहोचले. खापरी उड्डाल पुलाजवळ खापरी येथील नागरिक आणि मैत्री परिवारातर्फे ढोलताशा आणि पुष्पवर्षावाने कोचेसचे स्वागत करण्यात आले. हे कोचेस नागपुरात कायमस्वरूपी आणण्यात आले आहेत.प्रारंभी कोचेस घेऊन येणारे ट्रेलर वर्धा मार्गावरील सर्व्हिस रोड येथे उभे करण्यात आले. त्यानंतर मेट्रोच्या मिहान डेपोमध्ये आणण्यात आले. कोचेसला हैदराबाद येथून घेऊन येणाºया प्रोकॅम लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीचे अभियंते विनोद कुमार यांनी सांगितले की, तीन ट्रेलर तीन कोचेस घेऊन २९ जुलैच्या रात्री हैदराबाद येथून निघाले. तब्बल पाच दिवसानंतर बुधवारी दुपारी २.३० वाजता नागपुरात पोहोचले. १५ जणांच्या चमूने कोच नागपुरात आणण्यासाठी परिश्रम घेतले. ट्रेलरची गती प्रति तास २० ते ३० कि़मी. एवढी होती. या कोचेसच्या माध्यमातून मेट्रो रेल्वेच्या ‘ट्रायल रन’चा शुभारंभ १५ आॅगस्टला होण्याची शक्यता आहे.
वाजतगाजत आले मेट्रोचे कोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:07 AM
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत विमानतळ ते मिहान मेट्रोपर्यंतच्या जमिनीवरून धावणाºया ५.६ कि़मी.च्या ‘ट्रायल रन’साठी.......
ठळक मुद्देहैदराबाद येथून नागपुरात आगमन : १५ आॅगस्टला ‘ट्रायल रन’