शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

१० जानेवारीपर्यंत चीनहून नागपुरात येणार मेट्रो रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:44 AM

मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत एकीकडे खापरी ते सीताबर्डीपर्यत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे नागपूरकरांना चीन येथून नागपुरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रतीक्षा आहे. मेट्रो रेल्वे १० जानेवारीपर्यंत नागपुरात पोहोचण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे‘सीआरआरसी’ला नाही मिळाले जहाज पॅकिंगचे काम पूर्ण, चेन्नाईला येणार गाडी

आनंद शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत एकीकडे खापरी ते सीताबर्डीपर्यत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे नागपूरकरांना चीन येथून नागपुरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रतीक्षा आहे. मेट्रो रेल्वे १० जानेवारीपर्यंत नागपुरात पोहोचण्याची शक्यता आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी २३ नोव्हेंबरला चीनची मेट्रो कोच तयार करणारी कंपनी ‘सीआरआरसी’च्या अधिकाऱ्यांसोबत नागपूर मेट्रोच्या पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले होते. त्यावेळी दीक्षित यांनी रेल्वे एक महिन्यात नागपुरात येण्याची घोषणा केली होती. परंतु अजूनही मेट्रो रेल्वे चीनहून रवाना झालेली नाही.२३ नोव्हेंबरला सीआरआरसीच्या डॉलियन प्रकल्पात मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रेल्वेला जहाजाने पाठविण्यासाठी पॅकिंग केले होते. या कामासाठी जवळपास १० ते १२ दिवस लागले. त्यानंतर रेल्वेला जहाजाने चेन्नईला पाठविण्याची वेळ आली तेव्हा जहाज उपलब्ध झाले नाही.एक ते दोन दिवसात जहाज उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर जहाजाने मेट्रो रेल्वे चेन्नईला पोहोचण्यास १५ ते २० दिवस लागतील. चेन्नई येथे पोहोचल्यानंतर रस्ते मार्गाने नागपुरात आणण्यात येईल. त्याकरिता १० ते १२ दिवस लागतील. या प्रकारे रेल्वे नवीन वर्षाच्या १० जानेवारीपर्यंत नागपुरात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनची सीआरआरसी कंपनी डॉलियनच्या मेट्रो कोच कारखान्यात मेट्रो रेल्वे तयार करण्यात येत आहे. या कंपनीला मेट्रो प्रकल्पासाठी २३ रेल्वे (६९ कोच) तयार करण्याचे कंत्राट दिले आहे. एका कोचची किंमत ८.०२ कोटी रुपये आहे.या रेल्वेत ३५ टक्के सुटे भाग भारत, जपान आणि अन्य देशात तयार झाले आहेत. मेट्रो रेल्वे तयार करण्यासाठी महामेट्रो आणि सीआरआरसी यांच्यात १५ आॅक्टोबर २०१६ ला लेटर आॅफ अलॉटमेंटवर (एलओए) स्वाक्षरी करण्यात आली होती.

टॅग्स :Metroमेट्रो