लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या रिच-३ अंतर्गत सीताबर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगरपर्यंत ११ कि़मी. अंतरावर ऑगस्टमध्ये मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये आरडीएसओ आणि सीएमआरएसची चमूतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच व्यावसायिक रनसाठी मंजुरी मिळणार आहे.लोकमान्यनगर ते सुभाषनगरदरम्यान ५.५ किमीच्या मार्गावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ मे रोजी ट्रायन रन घेण्यात आला. त्यानंतर दोन महिन्यात उर्वरित कामे पूर्ण केली आहे. ९५ टक्के विद्युतीकरण झाले आहे. ११ कि़मी. मार्गावर व्हायाडक्ट कामाला १ डिसेंबर २०१६ रोजी सुरुवात करण्यात आली होती. आता १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. सरासरी एक दिवसात ४ सेगमेंट तयार करून केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत ३९३ पियरवर ३५६४ सेगमेंट लॉचिंग करीत व्हायाडक्टचे कार्य पूर्ण केले. यामध्ये ३९३ फाऊंडेशन, ३९३ पियर, ३५६४ सेगमेंट कास्टिंग, २६६ ओपन फाऊंडेशन, ५५८ पाईल, ३१८ पाईल कॅप, १४९ आय गर्डर कास्टिंग, ३३ डेक स्लॅब कास्टिंग, १२७ पाईल कॅप, ३४५ सेगमेंट स्पॅन लॉचिंग, ६१ कॉनकॉर्स आणि ट्रॅक आर्म्सचा समावेश आहे. हिंगणा येथील मेट्रोच्या कास्टिंग यार्डमध्ये व्हायाडक्टचे सर्व सेगमेंट तयार करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या मार्गावरील प्रकल्पाचे बांधकाम करताना २५ मीटर उंचीवर झाशी राणी चौक येथील शहीद गोवारी उड्डाण पूल येथे सिमेंट गर्डरचे यशस्वीरीत्या लॉचिंग करण्यात आले.या मार्गावर औद्योगिक वसाहती, कॉलेज, शासकीय कार्यालय असल्यामुळे वाहनांची जास्त वाहतूक असते. अशा परिस्थितीत निर्धारित वेळेत व सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत वाहतूक आणि सिव्हील कामांचे योग्य नियोजन करीत महामेट्रोने बांधकाम पूर्ण केले आहे. हिंगणा येथे औद्योगिक कंपन्या आणि महाविद्यालये असल्याने या सर्व प्रवाशांना लवकर मेट्रोची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. या मार्गावरील लिटील वूड व अंबाझरी तलाव या ठिकाणी गॅलरी तयार करण्यात येत असून मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांना विहंगम दृश्य बघायला मिळेल.११ कि़मी. मार्गावर ११ स्टेशनसीताबर्डी इंटरचेंज, झाशी राणी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, शंकरनगर, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज, सुभाषनगर, रचना रिंग रोड, बन्सीनगर, वासुदेवनगर, लोकमान्यनगर. या सर्व स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू आहे.
ऑगस्टमध्ये सुरू होणार मेट्रोचा व्यावसायिक रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:15 AM
महामेट्रोच्या रिच-३ अंतर्गत सीताबर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगरपर्यंत ११ कि़मी. अंतरावर ऑगस्टमध्ये मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये आरडीएसओ आणि सीएमआरएसची चमूतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच व्यावसायिक रनसाठी मंजुरी मिळणार आहे.
ठळक मुद्देसीताबर्डी ते लोकमान्यनगर : ११ कि़मी. ११ स्टेशन