शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मेट्रोचा कामठी मार्गावरील ‘डबल डेकर’ उड्डाणपूल उद्यापासून सुरू होणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 03, 2024 6:58 PM

५.६७ किमी : ५७३ कोटींची गुंतवणूक; गड्डीगोदाम ते आॅटोमोटिव्ह चौक

नागपूर : एलआयसी चौक ते आॅटोमोटिव्ह चौक ५.६७ किमी लांबीचा चार पदरी डबल डेकर उड्डाणपूल ५ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल. कामठीहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येईल. त्यामुळे वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे. उभारणीसाठी ‘रिब अ‍ॅन्ड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. बांधकाम अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघड होते. विशेषत: गड्डीगोदाम येथे असलेला भूमिगत मार्गावर वाहतूक आणि रेल्वे मार्गावर सतत रहदारी असल्यामुळे भारतीय रेल्वेकडून एकूण २४ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. उड्डाणपुलांवर गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, आॅटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानक बांधण्यात आली आहेत. 

स्थापत्य कलेचे अद्भूत उदाहरण

५.६७ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल सर्वाधिक लांबीचा असून  सिंगल कॉलम पिल्लरवर उभा आहे. स्थापत्य कलेचे अद्भूत उदाहरण आहे. उड्डाणपूलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिनी पातळीवर आधीच अस्तित्वात असलेला महामार्ग आहे. गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे. देशातील ही पहिली रचना असून त्यामध्ये चारस्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. वर्धा आणि कामठी या दोन्ही बहुस्तरीय मार्गाची बेरीज केली तर महामेट्रोने सुमारे नऊ किमीचा डबल डेकर उड्डाणपूल बांधला आहे.  गड्डीगोदाम येथे चारस्तरीय वाहतूक व्यवस्था

महामेट्रोने भारतीय रेल्वे ट्रॅकवर ८० मीटर लांब आणि १६५० टन वजनाचे स्टील गर्डर लाँच केले. हा अनोखा रेकॉर्ड आहे. ८०० टन वजनाच्या स्टील गर्डरला ३२ हजार एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला. संपूर्ण स्ट्रक्चरसाठी ८० हजार बोल्टचा वापर करण्यात आला. जमिनीपासून स्टील गर्डरची उंची २५ मीटर आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच २२ मीटर रूंद स्टील गर्डर स्थापन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर