शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

मिडास हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:14 AM

मिडास हॉस्पिटलमध्ये १० एप्रिल २०१८ रोजी मृत पावलेल्या एका १८ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध फौजदारी आणि महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस, व्यक्ती व मेडिकेअर संस्था-२०१० या कायद्याच्या कलम १४३, १४७, १४९, ४२७ अन्वये बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू : कारवाईसाठी व्हीएचएने मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिडास हॉस्पिटलमध्ये १० एप्रिल २०१८ रोजी मृत पावलेल्या एका १८ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध फौजदारी आणि महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस, व्यक्ती व मेडिकेअर संस्था-२०१० या कायद्याच्या कलम १४३, १४७, १४९, ४२७ अन्वये बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, मृतदेह आणि मृत्यूचा दाखला नातेवाईकांकडे सोपविल्यानंतरही त्यांनी हॉस्पिटलचे बिल भरले नव्हते. तरुणाच्या मृत्यूनंतर अर्धा तासातच ३०० लोकांच्या जमावाने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जमावाने गोंधळ घातल्यानंतर लगतच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स मिडासमध्ये गोळा झाले होते. गोंधळ घालून हॉस्पिटलची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या चार जणांची पोलिसांना ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्यची ओळख पटविण्यात येत आहे.२०१० च्या कायद्यांतर्गत नोंदविलेला गुन्हा दखलपात्र आणि गैरजमानत ठरतो. या गुन्ह्यात तीन वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय नातेवाईक वा रुग्णाला दुप्पट नुकसान भरपाई द्यावी लागते.या प्रकरणी विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने (व्हीएचए) पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस उपायुक्त (झोन-१) कृष्णकांत उपाध्याय आणि बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांची भेट घेऊन मिडास हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी नोंदविलेल्या तक्रारीच्या आधारे गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची विनंती केली. या प्रकरणाचा मुख्यमंत्री कार्यालयाने पाठपुरावा केला. तातडीने कारवाई केल्याबद्दल विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCrimeगुन्हा