लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.मिलिंद पखाले यांनी बुधवारी पत्रपरिषद घेऊन भारिप बहुजन महासंघप्रणित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच राजकारणावर टीका केली. ते म्हणाले, राज्यात काहीही ताकद नसताना ४७ जागी उमेदवार उभे करून वंचित बहुजन आघाडीने आरएसएस व भाजपला सरळ व स्पष्ट पाठिंबा दिला आहे.आंबेडकरी जनतेसह वंचित बहुजनांची मते कुजवण्याचे काम यातून झाले आहे. तसेच वंचित हे नवे लेबलही आम्हाला मान्य नसल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.यावेळी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गौतम वासनिक, विवेक वाकोडे, जोगेंद्र सरदारे, डॉ. जयप्रकाश धोंगडे, अरुण देठे, यशवंत म्हैसके, जगदीश फुलझेले, नरेंद्र ढोणे, दिनकर रामटेके, अजय खळसिंगे, अशोक खंडाळे, ज्ञानदेव इंदुरकर, अंबादास धोंगडे, ज्ञानेश्वर टेंभुर्णे यांची नावे स्वाक्षरीसह होती. तर डॉ. बिंदुसार उके, शालिक नन्नावरे, अंगराज शेंडे, भारत थुलकर यांचीही नावे आहेत. परंतु त्यांची स्वाक्षरी नाही. हे सर्व भारिप सोडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.‘मिलिंद पखाले आणि त्यांची टीम गेल्या वर्षभरापासून पक्षासाठी कुठलेही काम करीत नव्हती. पक्ष वाढवणे दूर उलट पक्षविरोधी काम करण्याचेच कार्य केले. याउलट प्रकाश आंबेडकरांनी त्यांना प्रवक्तेपद देऊन त्यांना संधी दिली. परंतु त्यांचे पक्षविरोधी कार्य सुरूच होते. याची पक्ष नेतृत्वालाही माहिती झाल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार होती. त्यापूर्वीच त्यांनी पक्ष सोडला हे बरे झाले. ते गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. उलट पक्ष अधिक मजबूत होईल.’-सागर डबरासे, महासचिव,भारिप बहुजन महासंघ.
मिलिंद पखाले यांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:41 AM
भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ठळक मुद्देपूर्व विदर्भातील आघाडीला खिंडार