शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मिलिंद सोमण यांच्या हस्ते ‘कोअर’ वेलनेस सेंटरचे उद्घाटन

By admin | Published: August 07, 2016 2:30 AM

रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी सेवा वाढविण्यासाठी आणि त्यांना मध्य भारतात जागतिक दर्जाची सेवा

नागपूर : रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी सेवा वाढविण्यासाठी आणि त्यांना मध्य भारतात जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोअर वेलनेस सेंटरचा शुभारंभ केला आहे. सुप्रसिद्ध मॉडेल तथा बॉलिवूड कलावंत मिलिंद सोमण यांच्या हस्ते कोअर वेलनेस जीम, स्पा आणि सलूनचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये करण्यात आले. कोअर वेलनेस सेंटरने आपल्या ग्राहकांना तसेच वंचित असलेल्या सदस्यांना स्पा, सलून आणि जीममध्ये व्यापक श्रेणीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोअर जीम हे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असून जीममध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीची उपकरणे उपलब्ध आहेत. स्पा आणि सलूनच्या वतीने ग्राहकांना मेदयुक्त विशेष मिश्रणाच्या साह्याने थाय मसाज तसेच निवडक मसाज थेरपी आणि विशेष तेलाने मसाजची सेवा पुरविण्यात येईल. ग्राहकांचे समाधान होईल, अशा पद्धतीने त्यांना कोअरमध्ये सेवा पुरविण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांना आनंद होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर बोलताना अभिनेता मिलिंद सोमण म्हणाला, भारत देश हा स्वस्थ आरोग्यामुळे ओळखल्या जातो. भारताने जगाला स्वस्थ आरोग्याचा संदेश दिला आहे. कोअर जीममध्ये आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची उपकरणे आणि सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हॉटेल सेंटर पॉर्इंटचे संचालक मिक्की अरोरा, अर्जुनसिंग अरोरा, गुरुचरण सिंग, अंगद अरोरा आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी हॉटेल सेंटर पॉर्इंट रामदासपेठ येथे संपर्क साधावा. (वा. प्र.)