नागपूर : एका कंटेनरमधून मुंबईमार्गे दुबईसाठी जात असलेले अडीच कोटींचे रक्तचंदन शहरात पकडण्यात आले आहे. ही कारवाई कस्टम आणि वन विभागाने संयुक्तपणे केली. माहिती सूत्रानुसार ट्रक क्र. एमपी /०९/ एचएफ/५२२३ हा कंटेनर रायपूरवरून नागपुरात दाखल झाला होता. मात्र त्याची कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना अगोदरच गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर परिसरात कस्टम अधिकाऱ्यांनी त्या कंटेनरला अडवून ताब्यात घेतले. या कंटेनरमधून आयर्न स्पंजच्या नावाखाली कोट्यवधीच्या रक्तचंदनाची तस्करी केली जात होती. विशेष म्हणजे, कंटेनरमध्ये रक्तचंदन दिसताच कस्टम अधिकाऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानुसार नागपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी (दक्षता) केवल डोंगरे यांच्या नेतृत्वात आरएफओ विजय गंगावणे, विनायक उमाळे, वनपाल टी. पी. चौधरी व जयस तायडे घटनास्थळी पोहोचले.
कोट्यवधीचे रक्तचंदन पकडले
By admin | Published: October 04, 2016 6:13 AM