शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

मनोरुग्णालयात लाखोंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:22 AM

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाºया मनोरुग्णांना ४० रुपयांची औषधे तब्बल ८० रुपयांना दिली जायची.

ठळक मुद्दे४० रुपयांची औषधे ८० रुपयांत : प्रशासनात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाºया मनोरुग्णांना ४० रुपयांची औषधे तब्बल ८० रुपयांना दिली जायची. शासकीय तिजोरीत मात्र ४० रुपयेच भरले जायचे. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येत असून यात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, मनोरुग्णालयाला आता जाग आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे, मनोरुग्णांची गळा दाबून हत्या व रुग्णालयातच अल्पवयीन रुग्णावर अत्याचाराच्या घटनेमुळे हे रुग्णालय चर्चेत आले असताना आता ‘ओपीडी’मधील घोटाळ्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मनोरुग्णालयात नागपूरसह संपूर्ण विदर्भ व मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांकडून एका महिन्याच्या औषधांसाठी ४० रुपये घेतले जातात, तर बाहेरगावच्या रुग्णांकडून (दूर राहतात म्हणून) दोन महिन्याच्या औषधांसाठी ८० रुपये घेतले जातात.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा कर्मचारी नागपुरातील रुग्णांकडून महिन्याच्या औषधाकाठी ४० रुपये ऐवजी ८० रुपये घ्यायचा. ८० रुपयांची पावतीसुद्धा तो संबंधित रुग्णांना द्यायचा. शासकीय तिजोरीत मात्र तो ४० रुपयेच जमा करायचा. मागील दोन वर्षांपासून हा ‘कारभार’ बिनदिक्कतपणे सुरू होता. आठवडाभरापूर्वी संबंधित कर्मचारी सुटीवर गेला.त्यामुळे त्याच्या जागी दुसरा कर्मचारी आला. त्याला पावत्यांमध्ये मोठी तफावत आढळून आली. एवढेच नव्हे तर, अनेक पावत्यांमध्ये खोडतोड करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. त्याने याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांना दिल्यावर हा घोटाळा सामोर आला.प्रशासनाला आपल्या अफरातफरीची माहिती झाल्याचे समजताच संबंधित कर्मचारी फारार झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने अद्यापही संबंधित कर्मचाºया विरोधात पोलिसात तक्रार केली नसल्याचे समजते.प्रकरणाची चौकशी सुरूमनोरुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी भागवत लाड यांनी सांगितले, संबंधित कर्मचाºयाने केलेल्या गडबडीची प्राथमिक माहिती असून वैद्यकीय अधीक्षकांच्या सूचनेनुसार कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. घोटाळा झाल्याचे चौकशीत समोर येताच पुढील कारवाईसाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविला जाईल.