शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

मंत्रिमहोदय, नंबरच बंद आहे, कुठे करायची तक्रार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:21 AM

कमल शर्मा नागपूर : घरचा वीजपुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. अखेर ...

कमल शर्मा

नागपूर : घरचा वीजपुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. अखेर आपण महावितरणच्या वेबसाईटवर जातो. तिथ ठळकपणे दिलेले संपर्क क्रमांक पाहून आपण भलतेच खुश होतो. फोन लावतो, मात्र पलीकडून ऐकायला मिळते, ‘या क्रमांकाची इनकमिंग सेवा बंद करण्यात आली आहे.’ ऐकून आपले अवसान गळते, गप्प बसण्याशिवाय

दुसरे असते तरी काय? हा प्रकार आहे महावितरणचा ! आश्चर्य म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशावरूनच हे संपर्क क्रमांक वेबसाईटवर टाकलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी महावितरणला हे दोन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. यातील एक लॅण्डलाईनचा क्रमांक (०२२-४१०७८५००) आहे. वीज गेल्यावर मिस कॉल देऊन या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे महावितरणचेच आवाहन आहे. मात्र त्यावर इनकमिंग कॉल बंद असल्याची माहिती मिळते. याच प्रकारे ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस करण्याचेही आवाहन आहे. मात्र एमएसएम पाठविल्यावर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. संपर्क सेवाही बंद आहे.

...

बिल न भरल्याने सेवा खंडित

महावितरणचे अधिकारी या संदर्भात काहीच सांगत नाहीत. मात्र, मोबाईल आणि टेलिफोनचे बिल न भरल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी तर तक्रारकर्त्यांच्या वारंवार येणाऱ्या कॉलचा त्रास वाचविण्यासाठी मुद्दामहून इनकमिंग कॉल बंद करून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार घडत होता.

...

सेवा बंद असतानाही वेबसाईटवर नंबर कशाला?

महावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग) उदय गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा लॉकडाऊनच्या प्रारंभाला दिली होती. फक्त वाणिज्य आणि औद्योगिक सेवा असणाऱ्या ग्राहकांसाठी हे क्रमांक उपलब्ध होते. मात्र आता ही सेवा बंद आहे. त्यामुळे सेवा बंद असताना वेबसाईटवर संपर्क क्रमांक ठेवलेच कशाला, असा मुद्दा उपस्थित होणे स्वाभाविक आहे. हे क्रमांक घरगुती ग्राहकांसाठी नसल्याचेही महावितरणने लिहिलेले नाही. अशा वेळी नागरिकांनी तक्रार करायची तरी कोणत्या क्रमांकावर, हे आता वीजमंत्र्यांनाच विचारायची वेळ आली आहे.