लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ९ महिन्याच्या चिमुकलीला पाण्यात बुडवून मारण्यापूर्वी आणि स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आरोपी सोनू याने चिमुकलीला विष दिले होते, अशी संतापजनक माहिती पुढे आली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत.आरोपी सोनू ( वय ३२) हा सक्करदरातील भांडे प्लॉट चौक, शंकर साई मठाजवळ पत्नी तबस्सुम (वय ३२) तसेच अल्बिना, ऊर्फ बाई, ऊर्फ नूर नमक ९ महिन्याच्या चिमुकलीसह राहत होता. वाहन चालक असलेला सोनू लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाला होता. त्याची तीव्र आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे तो सारखा चिडचिड करायचा दिलेल्या पैशातून पत्नी व्यवस्थित खर्च करत नाही आणि चिमुकल्या नूरची काळजी घेत नाही, असा त्याचा समज झाला होता. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने चिमुकल्या नूरला गुरुवारी दुपारी २ ते ४ च्या दरम्यान आधी विष दिले त्यानंतर तिला मठजवळ ठेवलेल्या ड्रममधील पाण्यात बुडवून ठार मारले. त्यानंतर स्वत: विष घेऊन स्वत:च्या गळ्यावर घाव मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या या कुकृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून, त्याची पत्नी तबस्सुम हिने दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पाण्यात बुडविण्यापूर्वी चिमुकलीला विष दिले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:15 PM
९ महिन्याच्या चिमुकलीला पाण्यात बुडवून मारण्यापूर्वी आणि स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आरोपी सोनू याने चिमुकलीला विष दिले होते, अशी संतापजनक माहिती पुढे आली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत.
ठळक मुद्देक्रूरकर्मा पित्याचा निर्दयीपणा : सर्वत्र संतापाचे वातावरण