शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Published: September 05, 2015 3:09 AM

स्वत:च्याच कुंटणखान्यावर बोगस पोलिसांची धाड घालणाऱ्या टोळीतील तिघांनी एका अल्पवयीन मुलीवर आठ महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्कार केला होता,...

आठ महिन्यानंतर पाप उजेडात : बोगस पोलीस मुख्य आरोपी नागपूर : स्वत:च्याच कुंटणखान्यावर बोगस पोलिसांची धाड घालणाऱ्या टोळीतील तिघांनी एका अल्पवयीन मुलीवर आठ महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्कार केला होता, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या प्रकरणात ‘त्या‘ टोळीसोबतच एका मोक्काच्या फरार आरोपीला अटक केली आहे. महिनाभरापूर्वी गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने एमआयडीसीत एक टोळी पकडली होती. ओळखीच्या व्यक्तींना तरुण मुली, महिला उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवायचे. त्यांना आपल्या कुंटणखान्यावर बोलवायचे. तेथे महिला किंवा मुलीसोबत विवस्त्र होताच पोलिसांच्या वेशातील या टोळीचे सदस्य धाड घालायचे. त्यानंतर ‘ती’ महिला किंवा मुलगी बलात्काराचा आरोप लावायची. पोलीस कारवाईचा आणि बदनामीचा धाक दाखवून ‘त्या’ व्यक्तीकडून लाखो रुपये उकळले जायचे. आरोपी चंद्रप्रकाश वारवटकर आणि अल्का ढोके हे या टोळीचे प्रमुख होते. ते अनेक महिला मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहित करीत होते. जानेवारी २०१५ मध्ये त्यांच्या जाळ्यात एक १५ वर्षीय मुलगी अडकली. आरोपी चंद्रप्रकाश वारवटकर आणि अल्का ढोके या दोघांनी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिला असता आरोपी वारवटकर, विशाल ऊर्फ दत्तु अंबादास दाभने आणि दिनेश गायकी या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. चौकशीत ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदविला. त्यानंतर आरोपी विशाल दाभने (रा. न्यू कैलास नगर, अजनी) तसेच त्याची साथीदार मेरी ऊर्फ सोनु मार्टीन पाल (वय १९, रा. पद्मावती नगर, रुद्र बीअर बार जवळ) या दोघांना अटक केली. (प्रतिनिधी)मोक्कात २६ वर्षांची शिक्षा ११ महिन्यांपासून होता फरारआरोपी विशाल दाभने याला मोक्का कायद्याखाली २६ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यातील १३ वर्षांची शिक्षा त्याने भोगली. २० आॅक्टोबर २०१४ ला तो २ महिन्यांच्या संचित रजेवर आला. त्यानंतर तो कारागृहात परत न जाता. फरार झाला. ११ महिन्यांपासून त्याला पोलीस शोधत होते. तो बिनधास्त गुन्हे करीत फिरत होता. अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजीक सुरक्षा विभागाचे पोनि बी.एम. पोवार, एपीआय वाय.एस. चौधरी, पीएसआय कैलास इंगोले, हवलार प्रकाश सिडाम, मनोज चव्हाण, गोपाल वैद्य, संजय पांडे यांनी भांडे प्लॉट परिसरात त्याच्या मुसक्या बांधल्या.