शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात

By योगेश पांडे | Published: July 07, 2024 10:34 PM

महिला वॉर्डन, पोलिसांना बंद करून काढला होता पळ; बिना नंबर प्लेटच्या दुचाकीमुळे गवसल्या अल्पवयीन आरोपी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील बालसुधारगृहातील महिला वॉर्डन आणि पोलिस कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद करून फरार झालेल्या तीन अल्पवयीन मुलींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोघींवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. नागपुरातील दोन महिला वाहतूक पोलिसांच्या समयसूचकतेमुळे तिघी ताब्यात येऊ शकल्या.

तीनही आरोपी छत्तीसगडमधीलच रहिवासी आहेत. एकीने भावाचा खून केला होता तर दुसरीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली होती. तिसरीवर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तिघींनाही राजनांदगाव येथील महिला बालगृहात ठेवण्यात आले होते. ५जुलै रोजी संध्याकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास त्यांनी खोलीत आग लागल्याची माहिती लेडी वॉर्डनला दिली. लेडी वॉर्डन आणि महिला पोलीस कर्मचारी खोलीत पोहोचताच सुधारगृहातील एका खोलीत कोंडून तिघींनीही पळ काढला.

फरार होण्याअगोदर त्यांनी मोबाईल व रोख रक्कम लुटली. तसेच दुचाकीदेखील सोबत घेतली. राजनांदगाव येथील बसंतपूर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला. तिघीही दुचाकीने नागपूरला निघाले. त्यांनी रस्त्यात दुचाकीची नंबर प्लेटही काढली. तिघीही शनिवारी दुपारी नागपूरला पोहोचल्या.

वाहतूक शाखेच्या हवालदार वैशाली दुरुगकर आणि पूजा पुरी या वर्धमान नगर चौकात ड्युटीवर तैनात होत्या. त्यांची नजर ट्रिपल सीट जाणाऱ्या त्या मुलींवर पडली. दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले व कागदपत्रे मागितली. महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी मुलींनी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलींच्या संभाषणावरून त्या छत्तीसगडमधील असल्याचा पोलिसांना संशय आला. डिक्की तपासली असता त्यात कपडे व इतर वस्तू दिसल्याने महिला कर्मचाऱ्यांचा संशय बळावला. महिला कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अल्पवयीन मुलींना कार्यालयात आणले व चौकशी केली असता त्या बालसुधारगृहातून पळून गेल्याचे समजले. घटनेची माहिती तात्काळ राजनांदगाव पोलिसांना देण्यात आली. त्यांनी नागपूर गाठून अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले.

टॅग्स :nagpurनागपूर