शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नागपुरात उपद्रवी दारूड्याने घराला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:48 AM

एका उपद्रवी दारूड्याने शेजारच्यांवर असलेला राग काढण्यासाठी मध्यरात्री पेट्रोल ओतून त्यांचे दार पेटवून दिले. आग आणि धूरामुळे कोंडमारा झाल्याने जाग आलेल्या सदर कुटुंबातील सदस्यांनी वेळीच योग्य उपाययोजना करून स्वत:चा बचाव केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तकिया परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देअख्खे कुटुंब बचावले : धंतोलीतील घटना, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका उपद्रवी दारूड्याने शेजारच्यांवर असलेला राग काढण्यासाठी मध्यरात्री पेट्रोल ओतून त्यांचे दार पेटवून दिले. आग आणि धूरामुळे कोंडमारा झाल्याने जाग आलेल्या सदर कुटुंबातील सदस्यांनी वेळीच योग्य उपाययोजना करून स्वत:चा बचाव केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तकिया परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन सदर पोलिसांनी आरोपी राजेश मरापेकर (वय ४६) याला लगेच ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मरापेकर हा पुरता दारूच्या आहारी गेलेला आहे. दारूच्या नशेत तो दिवसभर उपद्रव करीत राहतो. विनाकारण अश्लिल शिवीगाळ करून महिला-मुलींना त्रास देतो. त्याच्या बाजुला सुरेश परतेकी यांचे कुटुंब राहतात. परतेकी कुटुंबीयांसोबत आरोपी मरापेकरचे अजिबात पटत नाही. दारू पिऊन त्रास देत असल्याने त्याला परतेकी कुटुंबातील सदस्य नेहमी हटकत राहतात. चार दिवसांपूर्वी याच कारणावरून त्याच्यासोबत मरापेकरचा वाद झाला होता. त्यावेळी तुझे पुर्ण कुुटंूंब मी जाळून टाकेन, अशी धमकी त्याने दिली होती. दारूच्या नशेत बरळतो, असे समजून परतेकी कुटुंबीयांनी त्याचयाकडे लक्ष दिले नाही. दरम्यान, नेहमीप्रमाणे रविवारी रात्री सुरेश परतेकी, त्यांची पत्नी शोभा, मुलगी पायल आणि मुलगा हे सर्व जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री त्यांच्या घरात अचानक धूर जमा झाल्याने परतेकी कुटुंबीयांना गुदरमरल्यासारखे झाले. ते जागे झाले तेव्हा घरभर धूर होता आणि दाराजवळचा भाग जळताना दिसला. त्यामुळे सुरेश परतेकी यांनी पाणी ओतून दाराजवळचे जळत असलेले कपडे विझविले. मात्र, दारला आतून बाहेरून आग लागली होती. त्यामुळे त्यांनी हिम्मत करून लाथा मारून दार तोडले. यात परतेकी भाजले. बाहेर आरोपी मरापेकर उभा होता. दार तोडून परतेकी कुुटुंबीय बाहेर येताच त्याने तेथून पळ काढला. दरम्यान,आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी दाराची आग विझविली. रात्रीच धंतोली ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. ठाणेदार प्रसाद सणस यांनी लगेच आपल्या सहका-यांच्या मदतीने ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.कुटुंंबच संपले असते !दारूड्या मरापेकरने आग लावल्याचे लगेच लक्षात आल्यामुळे आणि लगेच आवश्यक उपाययोजना करून परतेकी कुटुंबीय घराबाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा आगीने रौद्र रुप धारण केले असते तर संपुर्ण परतेकी कुटुंबीयांच्या जीवालाच धोका निर्माण झाला असता.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर